ह्युंडाईची एसयूव्ही विक्रीत पुन्हा अव्वल
नवी दिल्ली :
जून 2025 मध्ये ह्युंडाई क्रेटा भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनली. एसयूव्हीने मारुती सुझुकी डिझायर आणि टाटा नेक्सन सारख्या कार्सना देखील मागे टाकले आहे. जूनमध्ये क्रेटाला 15,786 ग्राहक मिळाले, ज्यात क्रेटा ईव्हीच्या ग्राहकांचा देखील समावेश आहे. ह्युंडाई मोटरची क्रेटा ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. जून 2025 मध्येही, क्रेटा एसयूव्ही विक्रीच्या बाबतीत आघाडीवर आहे. विक्रीच्या बाबतीत, ही एसयूव्ही मारुती सुझुकी डिझायर, इर्टिगा, ब्रिझा, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टाटा नेक्सॉन सारख्या अनेक कारशी स्पर्धा करते.
जून 2025 मध्ये भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ह्युंडाई क्रेटाने एकूण 15,786 ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ह्युंडाई क्रेटा ईव्ही लाँच करण्यात आली. हळूहळू, ही ईव्ही लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. जून ते जानेवारी या कालावधीत आतापर्यंत क्रेटा ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही राहीली आहे.
ह्युंडाई मोटर इंडियाचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांनी यावेळी सांगितले की, क्रेटा ही केवळ एक कार नाही. ही 12 लाखांहून अधिक भारतीय कुटुंबांची भावना आहे. गेल्या 10 वर्षांत, क्रेटाने एसयूव्ही विभागाला एक नवीन ओळख दिली आहे.