For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ह्युंदाईची नवीन एसयूव्ही लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार

06:33 AM Sep 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
ह्युंदाईची नवीन एसयूव्ही लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

कार उत्पादक ह्युंदाई मोटर इंडिया लवकरच भारतीय बाजारात एक नवीन एसयूव्ही लॉन्च करणार आहे. ह्युंदाईच्या नवीन एसयूव्हीचे नाव ह्युंदाई बायोन आहे. भारतीय बाजारात ही गाडी व्हेन्यू आणि क्रेटा यांच्या दरम्यान ठेवली जाईल अशी अपेक्षा आहे. ह्युंदाई या सणासुदीच्या काळात आपली नवीन एसयूव्ही बायोन लॉन्च करू शकते. चला तर मग, नवीन ह्युंदाई बायोनमध्ये काय पाहायला मिळेल ते जाणून घेऊया.

ह्युंदाई बायोन कंपनीच्या एसयूव्ही लाइनअपमध्ये एक नवीन स्थान मिळवेल. तिची लांबी सुमारे 4.2 मीटर असण्याची शक्यता आहे, म्हणजेच ती आकाराने व्हेन्यूपेक्षा मोठी आणि क्रेटापेक्षा लहान असू शकते. अहवालानुसार, बायोन पेट्रोलसोबत सीएनजी पॉवरट्रेनमध्येही उपलब्ध होऊ शकते. तथापि, इंजिन आणि मायलेजबाबतची अधिकृत माहिती कंपनीने अद्याप शेअर केलेली नाही.

Advertisement

ह्युंदाईची नवीन एसयूव्ही भारतीय रस्त्यांवर चाचणीदरम्यान अनेक वेळा दिसली आहे. टेस्ट मॉडेल पाहता, असा अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी नेहमीच्या बॉक्सी एसयूव्हीऐवजी याला क्रॉसओवरसारखे डिझाइन देऊ शकते. ह्युंदाईची नवीन डिझाइन लँग्वेज या नवीन एसयूव्हीमध्ये पाहायला मिळते. यामध्ये पातळ एलईडी लाइट्स, चौकोनी व्हील आर्च आणि आधुनिक फ्रंट डिझाइन असण्याची शक्यता आहे. आतील छायाचित्रे आणि टेस्ट मॉडेल्सवरून असे सूचित होते की, या एसयूव्हीमध्ये वक्र ड्युअल-क्रीन सेटअप, नवीन स्टीयरिंग व्हील आणि हलक्या रंगाची केबिन असू शकते. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स व्हेरिएंटचीही अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.