कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ह्युंडाई व्यावसायिक वाहने करणार सादर

07:00 AM Jan 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतात सादर होणार इलेक्ट्रिक वाहने : टीव्हीएससोबत भागीदारी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

कोरियन कंपनी ह्युंडाई मोटार भारतीय व्यावसायिक बाजारपेठेत प्रवेश करण्याची तयारी करत आहे. कंपनीने नुकत्याच झालेल्या भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये ई3डब्लू आणि ई4डब्लू ही मॉडेल सादर केली आहेत. ह्युंडाईने कंपनीच्या प्रोग्रॅम फॉर ह्युमॅनिटी या दृष्टीकोनातून ही मॉडेल्स विकसित केली आहेत.

ह्युंडाईची टीव्हीएस सोबत हातमिळवणी

कंपनीने भारतीय दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारी अंतर्गत दोन्ही कंपन्या संयुक्तपणे इलेक्ट्रिक तीनचाकी ई3डब्लू आणि मायक्रो चारचाकी ई4डब्लू या वाहनांची निर्मिती करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र अद्याप दोन्ही कंपन्यांमधील भागीदारीसाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी झालेली नाही. कंपन्या सध्या अशा शक्यतांचा शोध घेत आहेत. ह्युंडाई डिझाइन आणि विकास हाताळत आहेत. टीव्हीएस उत्पादन आणि वितरण व्यवस्थापन करणार  आहे.

ह्युंडाई ई3डब्लू

इलेक्ट्रिक 3 व्हीलर संकल्पनेच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर ही एक बहुउद्देशीय आणि पर्यावरणपूरक आहे. ही गाडी शहरातील अरुंद गल्ल्यांमध्ये चालविण्यासाठी डिझाइन केलेली आहे. नवे फिचर्स : ह्युंडाईच्या नव्या मॉडेल्समध्ये कंपनीने अॅगल विंडशील्ड, फ्लॅट फ्लोअर, मोठा व्हीलबेस, अधिक लेगरुम आणि आरामदायी राईडसाठी मोठे टायर्स दिले आहेत. मागील सीट फोल्ड करुनही व्हीलचेअर करुन बसता येते. मोबाईल होल्डरसह फ्युचरिस्टिक इन्फॉर्मेशन डिस्प्ले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article