ह्युंइाई मोटरचा नफा 11 टक्क्यांनी घटला
मुंबई :
वाहन कंपनी ह्युंइाई मोटर इंडिया लिमिटेडने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 1,161 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. ही वर्षाच्या सरासरी पाहिल्यास 19 टक्क्यांची घट आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,425 कोटींची नफा कमाई केली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या तिमाहीत ह्युंडाई मोटरने 16,648 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
ह्युंडाई मोटर इंडिया ही देशातील दुसऱ्या नंबरची मोठी ऑटो क्षेत्रातील कंपनी आहे. नफ्यात 19 टक्के घट झाली असून त्यामागे देशांतर्गत मागणीत झालेली घट तसेच भूराजकीय अस्थिर स्थितीमुळे निर्यातीवर झालेल्या परिणाम कारणीभूत ठरला आहे. सदरच्या तिमाहीत विक्रीत घट झालेली असून चौथ्या तिमाहीत एक अंकी विक्रीत वाढ होण्याचे संकेत आहेत.
काय म्हणाले गर्ग
पूर्णवेळ संचालक तरुण गर्ग म्हणाले, कंपनी बाजारात इलेक्ट्रीक कार्समध्ये 20 टक्के हिस्सेदारी मिळवण्यासाठी धडपडते आहे. यामध्ये नव्याने दाखल झालेली क्रेटा ही इलेक्ट्रीक कार महत्त्वाची भूमिका बजावेल असे वाटते. इव्ही इकोसिस्टम बांधणीसाठी कंपनी प्रयत्नशील असून हायड्रोजन, हायब्रिड आणि फ्लेक्सीबल इंधनासारख्या पर्यायावर विचार केला जात आहे.