महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुढील महिन्यात ह्युंडाई मोटरचा आयपीओ येणार

06:13 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंपनी जवळपास 25,000 कोटी रुपये उभारणार : एलआयसीनंतरचा सर्वात मोठा आयपीओ

Advertisement

मुंबई :

Advertisement

बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर, ह्युंडाई मोटर इंडिया भारतीय बाजारपेठेत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये आपला आयपीओ लॉन्च करू शकणार असल्याचा अंदाज आहे.

ह्युंडाइने आयपीओसाठी जून 2024 मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे आपला रितसर अर्ज कागदपत्रांसह दाखल केला होता. कंपनी आयपीओद्वारे सुमारे 25,000 कोटी रुपये उभारण्याच्या विचारात आहे, ज्यासाठी कंपनी एकही नवीन शेअर जारी करणार नाही. कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार आणि प्रवर्तक त्यांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे विकतील. भारतातील कोणत्याही ऑटो निर्मात्या कंपनीचा हा 20 वर्षांतील पहिला आयपीओ  राहणार आहे.

यापूर्वी मारुती सुझुकीचा 2003 मध्ये आयपीओ आला होता. मारुती सुझुकी इंडियानंतर ह्युंडाई ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माती कंपनी आहे. एलआयसीनंतर हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. ह्युंडाईच्या आयपीओची किंमत सुमारे 25 हजार कोटी रुपये असेल.

चौथी ऑटो कंपनी

2022 मध्ये, सरकारने एलआयसीमधील 3.5 टक्के हिस्सा विकला. यासाठी सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यात आला होता. चौथी सर्वात मोठी सूचीबद्ध ऑटो कंपनी ह्युंडाई मोटर इंडिया आहे. ह्युंडाई मोटर भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यास, मारुती-सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा नंतर ती चौथी सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article