For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसऱ्या तिमाहीत ह्युंडाई मोटरला 1234 कोटींचा नफा

06:14 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिसऱ्या तिमाहीत ह्युंडाई मोटरला 1234 कोटींचा नफा
Advertisement

महसूल 17973 कोटींवर : ऑक्टोबर-डिसेंबरमधील कामगिरी

Advertisement

नवी दिल्ली :

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी ह्युंडाई मोटर इंडिया यांनी आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने नफ्यामध्ये 6 टक्के वाढ वर्षाच्या आधारावर नोंदविली आहे. ह्युंडाई मोटर इंडिया यांनी नफ्यासंदर्भातील माहिती भारतीय शेअर बाजाराला दिली आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 1234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीत 1160 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला होता. महसूलाचा विचार करता कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 17973 कोटी रुपयांचा महसूल 8 टक्के वाढीसह मिळविला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत महसूल 16648 कोटी रुपयांचा राहिला होता.

Advertisement

काय म्हणाले सीईओ

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ तरुण गर्ग म्हणाले, कार विक्रीमध्ये चांगली कामगिरी करण्यासोबतच खर्चावरही नियंत्रण मिळविण्यात आल्याने कंपनीला नफा व महसूलामध्ये चांगली कामगिरी पार पाडता आली.

जानेवारीत कार विक्री दमदार

जानेवारीमध्ये कार विक्री दमदार राहिली होती. तिसऱ्या तिमाहीमध्ये 1,46,548 वाहनांची विक्री झाली आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,46,022 वाहनांची विक्री केली होती. 48,888 इतक्या वाहनांची कंपनीने सदरच्या तिमाहीत निर्यात केली आहे. निर्यात वर्षाच्या आधारावर 21 टक्के वाढलेली दिसून आली. जीएसटी सवलतीचा लाभ देशांतर्गत होणारी विक्री वाढीसाठी व निर्यातीसाठी महत्त्वपूर्ण ठरला होता.

Advertisement
Tags :

.