कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ह्युंडाई मोटर इंडियाच्या नफ्यात घट

07:00 AM Aug 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी ह्युंडाई मोटर इंडियाने आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीच्या नफ्यात तिमाही कालावधीत 8 टक्के घसरण झाली आहे. कंपनीने या अवधीत 1362 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. देशांतर्गत मागणीत नरमाई, हॅचबॅक प्रकारातील कार्सच्या विक्रीत कमतरता, तणावपूर्ण भूराजकीय स्थिती ही कारणे नफा घटण्यामागची सांगण्यात येत आहेत. ग्राहकांनी अलीकडच्या काळात एंट्री लेव्हल हॅचबॅक ऐवजी कॉम्पॅक्ट एसयुव्ही प्रकारातील कार्स खरेदीवर भर दिल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

काय म्हणाले एमडी

एचएमआयएलचे व्यवस्थापकीय संचालक उनसू किम यांनी सांगितले की, आर्थिक आव्हानांचा तर सामना कंपनी करते आहेच सोबत जागतिक अनिश्चितता यामुळे कार्सच्या मागणीवर परिणाम जाणवतो आहे. दरम्यान कंपनीने ग्रामीण भागात उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सुधारीत आवृत्तीच्या कार आणणे व इतर ब्रँडशी स्पर्धा करण्यावरही कंपनीने लक्ष दिलेले आहे. तिमाही कार्सच्या मागणीचा कल पाहिल्यास ग्रामीण भागातून कार्सची मागणी 23 टक्के इतकी राहिली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article