For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ह्युंडाई मोटर इंडियाला तिमाहीत फटका

06:49 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
ह्युंडाई मोटर इंडियाला तिमाहीत फटका
Advertisement

नफ्यामध्ये 24 टक्क्यांची घट : वर्षात कंपनीच्या खर्चात 3,642 कोटी रुपयांची वाढ

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ह्युंडाई मोटर इंडियाला आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत नफ्याच्या आघाडीवर फटका बसला आहे. क्रेटा बनवणाऱ्या कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीतील 1,570 कोटी रुपयांवरून 24 टक्क्यांनी घसरून 1,189 कोटी रुपयांवर आला आहे. तथापि, कंपनीचा महसूल मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 17,061 कोटी रुपयांच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढून 20,191 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Advertisement

कंपनीच्या एकूण खर्चात 24 टक्के वाढ

ह्युंडाई मोटर इंडियाने अहवाल दिला आहे की, आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीतील त्यांचा एकूण खर्च मागील वर्षाच्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढून 18,845 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा खर्च 15,203 कोटी रुपये होता. म्हणजेच, एका वर्षात कंपनीच्या खर्चात 3,642 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

निकालानंतर शेअर्समध्ये 4 टक्के पेक्षा जास्त वाढ

कंपनीच्या तिमाही निकालानंतर ह्युंडाई मोटर इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स 4 टक्केपेक्षा जास्त वाढून 1,938 रुपयांवर पोहोचले. तथापि, दिवसअखेरीस 0.30 टक्केच्या वाढीसह ते 1,866.90 रुपयांवर बंद झाले.

Advertisement

.