ह्युंडाई मोटरने कमावला 1583 कोटी रुपयांचा नफा
मार्च तिमाहीचा निकाल केला जाहीर
वृत्तसंस्था/ चेन्नई
चारचाकी वाहन निर्माती कंपनी ह्युंडाई मोटर इंडियाने मार्च अखेरचा तिमाही निकाल जाहीर केला असून नफ्यामध्ये 4 टक्के घसरण कंपनीने नोंदवली आहे. मार्च अखेरच्या तिमाहीत कंपनीने 1583 कोटी रुपये नफा मिळवला आहे. एक वर्षा आधी मार्च तिमाहीअखेर कंपनीने 1649 कोटी रुपयांचा नफा कमवला होता. यासोबत मार्च अखेरच्या तिमाहित कंपनीने 2.5 टक्के वाढीसह 17 हजार 562 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये 17132 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. याच दरम्यान कंपनीने लाभांशाची घोषणा केली असून कंपनीने दिलेल्या माहितीनुसार समभागावर 21 रुपयांचा लाभांश कंपनीने घोषित केला आहे.
आर्थिक वर्षातली कामगिरी
2025 च्या आर्थिक वर्षाचा विचार करता 2024 च्या तुलनेमध्ये महसुलामध्ये 7.7 टक्के वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने 5492 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. दुसरीकडे निव्वळ नफ्यात आर्थिक वर्षात काहीशी घसरण झाली असून तो 5492 कोटी रुपयांवर राहिला होता.