For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ह्युंडाईची सुधारित वेर्णा बाजारात लाँच

06:01 AM Mar 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
ह्युंडाईची सुधारित वेर्णा बाजारात लाँच
Advertisement

मुंबई:

Advertisement

कार उत्पादक कंपनी ह्युंडाई मोटर इंडिया यांनी आपली नवीन सुधारित सेडान प्रकारातील वेर्णा ही गाडी नुकतीच लाँच केली आहे. नव्या डिझाईन आणि विविध वैशिष्ट्यांचा समावेश कारमध्ये करण्यात आला आहे. एकंदर 25 नवे बदल नव्या सुधारित वेर्णामध्ये केले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुधारित ह्युंडाई वेर्णाची किंमत एक्स शोरुम 10.98 लाख रुपये इतकी असणार आहे. यामधील वरील श्रेणीतील (टॉप व्हेरीयंट)कार ग्राहकांना 18.25 लाख रुपयांमध्ये घेता येणार आहे. सहा प्रकारांमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. वैशिष्ट्यांमध्ये पाहता ब्लॅक क्रोम रेडिएटर ग्रील, ड्युएल एलईडी प्रोजेक्टर हेड लॅम्प, नव्या डिझाईनचे फ्रंट व रियर बंपर, आर 16 डायमंड कट अॅलाय व्हिल्स यांचा समावेश असणार आहे. ड्यूअल 10.25 इंचाचा स्क्रीन, इन्फोटेन्मेंट सिस्टीम, डिजीटल इन्स्टूमेंट क्लस्टर, बोस कंपनीचे स्पिकर्स, लेदरेट सीट अपहोलस्ट्री, इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिक पॅसेंजर सीट दिली गेली आहे.

सुरक्षिततेसाठीदेखील काही वैशिष्ट्यो दिली गेली आहेत. यामध्ये फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोनॉमस् इर्मजन्सी ब्dरोकिंग, लेन किपींग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग ही वैशिष्ट्यो जोडली गेली आहेत. 6 एअरबॅगचा समावेश करण्यात आला आहे. 1.5 लिटर एमपीआय पेट्रोल इंजिन आणि 1.5 टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन्ससह ही गाडी येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.