For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ह्युंडाईच्या कार्स होणार महाग

06:02 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
ह्युंडाईच्या कार्स होणार महाग
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी ह्युंडाई मोटर इंडिया आपल्या कार्सच्या किंमती पुढील महिन्यापासून वाढविणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरच्या किंमती या 1 सप्टेंबरपासून लागू होणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरपासून आपल्या सर्व वाहनांच्या किंमती साधारणपणे 1 टक्क्यांपर्यंत कंपनी वाढविणार आहे. विविध मॉडेलनुसार किंमती वाढविण्याबाबतचा निर्णय घेतला गेला आहे. कच्च्या मालासोबतच उत्पादनासाठी येणारा खर्च वाढल्यामुळे कंपनीला वाहनांच्या किंमती वाढविणे अपरिहार्य ठरले. भूराजकीय तणाव त्याचप्रमाणे जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीवर उत्पादन खर्चावर दबाव पहायला मिळाला.

Advertisement

तिसऱ्यांदा होतेय वाढ

2026 मध्ये कंपनीने तिसऱ्यांदा आपल्या कार्सच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी 1 जानेवारी रोजी कंपनीने कार्सच्या किंमती 0.6 टक्के वाढविल्या होत्या. त्यानंतर 1 जून रोजी 1 टक्का इतकी किंमत गाड्यांची वाढविली गेली होती. त्यावेळी मॉडेल आणि प्रकारानुसार ह्युंडाईने जास्तीतजास्त 12800 रुपये कारमागे वाढविले होते. आता सप्टेंबरमध्ये पुन्हा कार्सच्या किंमती वाढविण्यात येणार असल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. 10 लाख रुपयांची कार खरेदी केल्यास त्यावर 10 हजार रुपयांपर्यंत अधिक रक्कम भरण्याची तयारी ग्राहकांनी ठेवायची आहे.

Advertisement
Tags :

.