कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Hypertension: उच्च रक्तदाब, मधुमेह शरीर मारणारी मूक हत्यारे, लवकर निदान गरजेचे का?

12:36 PM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आजार शरीरात खोलवर मुळं रोवतात आणि एके दिवशी गंभीर हानी करतात

Advertisement

कोल्हापूर : धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनशैलीत, अनेक गंभीर आजार माणसाच्या नकळत वाढत आहेत. त्यात उच्च रक्तदाब (हायपरटेंशन) आणि मधुमेह (डायबेटीस) हे प्रमुख आजार आहेत, जी ‘मूक हत्यारे’ म्हणून ओळखले जातात. कारण कोणतीही वेदना किंवा ठळक लक्षणे न देता, हे आजार शरीरात खोलवर मुळं रोवतात आणि एके दिवशी गंभीर हानी करतात.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतात सुमारे 20 कोटी लोकांना उच्च रक्तदाब आहे, आणि सुमारे दहा कोटी लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत. हे प्रमाण दरवर्षी वाढतच आहे.

मूक हत्यारे म्हणजे काय?

उच्च रक्तदाब व मधुमेह या दोन्ही आजारांची सुरुवात अत्यंत बेमालूमपणे होते. उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांमधील वाढलेला दबाव. ही स्थिती हृदयावर ताण आणते. पण सुरुवातीला कोणतेही लक्षण नसते. डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, हृदयात धडधड ही लक्षणे नंतर आणि उशिरा दिसतात.

मधुमेह म्हणजे शरीरात इन्सुलिनच्या कार्यात बिघाड होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. पण सुरुवातीला याची जाणीव होत नाही. त्यामुळे निदान होईपर्यंत अनेकदा नुकसान झालेले असते. हे आजार केवळ वयस्क लोकांपुरते मर्यादित नाहीत. आता तर 18 ते 30 वयोगटातील तरुणांमध्येहीही या आजारांची लागण वाढली आहे, हे विशेष चिंताजनक आहे.

भारतातील परिस्थिती

ग्रामीण भागात उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाची ओळख फार उशीरा होते. बहुतांश लोकं नियमित तपासणी करत नाहीत. काही भागांत अद्यापही आरोग्य शिक्षणाचा अभाव आहे..

लोक उपचारांना विरोध का करतात?

मला काहीच त्रास होत नाही. मग मी का औषध घेऊ? आत्तापासूनच औषधे का?,’ हा भ्रम जीवघेणा ठरु शकतो. औषधांचे दुष्परिणाम होतात, असा गैरसमज करुन घेतल्याने वैद्यकीय सल्ला घेणे टाळले जाते. दीर्घकालीन उपचारांचा कंटाळा केल्याने ते अखेरीस जीवघेणे ठरु शकतात.

खर्च होण्याची भीती आणि अपुरी माहिती आदी कारणांनी उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते. ही मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा डॉक्टरांवर विश्वास न ठेवणे, घरगुती अथवा भोंदू उपायांवर अवलंबून राहणे, या धोकादायक सवयी ठरतात.

सायलेंट हार्ट अॅटक : मधुमेहातील धोकादायक वास्तव

मधुमेहामुळे नर्व्ह सिस्टीम प्रभावित होते, त्यामुळे हृदयविकाराच्या वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे अनेक मधुमेही रुग्णांना हार्ट अॅटकचा त्रास वा जाणीवच होत नाही. ईसीजी, ईको, टीएमटी किंवा होल्टर अशा चाचण्या केल्याशिवाय हे लक्षात येत नाही.

शरीराचा आवाज ऐका

उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे ‘मूक हत्यारे’ असले, तरी योग्य माहिती, लवकर तपासणी आणि सवयींचा बदल, यामुळे त्यांना रोखता येते. लक्षणे नसली तरी धोका गंभीर असतो. आपली एक तपासणी हजार संकटांपासून बचाव करु शकते. तसेच वेळीच टाका घातला तर कमी दुखणार आणि उशीर केला तर ऑपरेशन करावे लागते.

वेळीच आजार ओळखून उपचार सुरू केल्याने नंतरचे खूप सारे कॉम्प्लेकेशन्स म्दस्ज्त्ग्म्atग्दहे टाळता येतात. आपल्या शरीराचा आवाज ऐका, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आजपासूनच कृती करा. निरोगी जीवनशैलीकडे पहिले पाऊल उचला, त्यातूनच निरोगी जीवन जगणे शक्य होणार आहे.

लवकर निदान का गरजेचे आहे?

दर सहा महिन्यांनी रक्तदाब आणि रक्तशर्करेची तपासणी केली पाहिजे. विशेषत: कुटुंबात कोणी रुग्ण असेल किंवा या आजाराने ग्रस्त असेल तर, इतर सदस्यांनी लवकर चाचण्या करून घ्याव्यात. लवकर निदानामुळे औषधे सुरुवातीस कमी लागतात आणि बरे होण्याची शक्यता वाढते.

जीवनशैलीत काय बदल करावेत?

रोज 30 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करावा. हिरव्या भाज्या, फळे, कमी मीठ-शुगरचा आहार घ्या. धूम्रपान-मद्यपान टाळा. झोपेची योग्य वेळ राखा. तणाव नियंत्रणासाठी ध्यान, प्राणायाम करा. कोणतेही दुखणे अथवा आजार नसला तरीही दर सहा महिन्यांनी तपासणी करा.

ग्रामीण आणि निमशहरी भागासाठी उपाय

आरोग्य शिबिरांची संख्या वाढवणे. आशा वर्कर्स आणि आरोग्य सेविकांद्वारे घरोघरी चाचण्या घेणे, मोबाईल आरोग्य केंद्रे सक्षम करणे. शाळा, ग्रामसभामध्ये आरोग्य जागरूकता मोहीम राबवणे.

परिणाम काय होऊ शकतात?

हृदयविकाराचा झटका येणे

► स्ट्रोक म्हणजे मेंदूतील रक्तपुरवठा बंद होणे

मूत्रपिंड निकामी होणे

► डोळ्यांचे अंधत्व येणे

► नसांचे (न्युरोपॅथी) नुकसान होणे

पायात गॅंगरीन होण्याचा धोका

Advertisement
Tags :
#diabetes#heart attack#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#WHOhypertensionmadhumeh
Next Article