For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राचे परीक्षण लवकरच

06:22 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राचे परीक्षण लवकरच
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

डीआरडीओ लवकरच एक्सटेंडेड ट्रॅजेक्टरी-लाँग ड्यूरेशन हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राचे (ईटी-एलडीएचसीएम) परीक्षण करणार आहे. हे क्षेपणास्त्र प्रोजेक्ट विष्णूचा हिस्सा आहे. या क्षेपणास्त्राला भारताच्या सर्वात अत्याधुनिक हायपरसोनिक तंत्रज्ञान मानले जात आहे.

ईटी-एलडीएचसीएम म्हणजेच एक्सटेंडेड ट्रॅजेक्टरी-लाँग ड्यूरेशन हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र हे ध्वनिच्या वेगापेक्षा 5 पट अधिक वेगासह (मॅक 5 पेक्षा अधिक) झेपावू शकते. हे क्षेपणास्त्र हायपरसोनिक टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हीकलवर (एचएसटीडीव्ही) आधारित असून याचे यशस्वी परीक्षण 2020 मध्ये झाले आहे.

Advertisement

ईटी-एलडीएचसीएम मल्टीरोल मिसाइल असून ते अनेक प्रकारच्या मोहिमांमध्ये वापरले जाऊ शकते. शत्रूचे तळ नष्ट करणे हे याचे मुख्य कार्य आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूचा बंकर, रडार स्टेशन, जहाज आणि सैन्यतळांना अचूक लक्ष्य करू शकते.

ईटी-एलडीएचसीएमची वैशिष्ट्यो..

ईटी-एलडीएचसीएम स्वत:चा वेग, रेंज आणि तंत्रज्ञानामुळे जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.

मोठा वेग : हे क्षेपणास्त्र मॅक 8 (जवळपास 11 हजार किमी/प्रतितास) पेक्ष अधिक वेगाने झेपावू शकते, म्हणजेच 1 सेकंदात 3 किमीपेक्षा अधिक अंतर कापू शकते. या वेगामुळे शत्रूचे रडार या क्षेपणास्त्राला ट्रॅक करू शकत नाहीत.

मोठा पल्ला : याची मारक क्षमता 1500 किमीपेक्षा अधिक आहे. हे पूर्ण पाकिस्तान आणि चीनच्या मोठ्या हिस्स्याला लक्ष्य करू शकते. हे आकाश, जमीन आणि समुद्रातूनही डागता येणारे क्षेपणास्त्र आहे.

स्क्रॅमजेट इंजिन : क्षेपणास्त्रात स्क्रॅमजेट इंजिन असून जे हवेतून ऑक्सिजन मिळविते, यामुळे हे दीर्घकाळापर्यंत हायपरसोनिक वेग राखू शकते. डीआरडीओने अलिकडेच 1 हजार सेकंदांपर्यंत स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी ग्राउंड टेस्ट केली आहे.

रडारपासून वाचण्याची क्षमता : हे क्षेपणास्त्र लो अल्टीट्यूटवर उ•ाण करते, मार्ग बदलू शकते, यामुळे याला ट्रॅक करणे किंवा रोखणे अवघड असते. यात ऑक्सिजन-रोधक कोटिंग अणि हीट-रेसिस्टेंट मटेरियल असून ते अत्याधिक उष्णता (2 हजार सेल्सिअस) सहन करू शकते.

विविध पेलोड : हे क्षेपणास्त्र आण्विक आणि बिगरआण्विक दोन्ही प्रकारची शस्त्रास्त्रs वाहून नेऊ शकते. हे 1000-2000 किलोग्रॅम वजनाचे पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे.

स्वदेशी तंत्रज्ञान : क्षेपणास्त्राला हैदराबाद येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिसाइल कॉम्पलेक्समध्ये डीआरडीओ आणि उद्योग भागीदारांनी निर्माण केले आहे. हे पूर्णपणे मेक इन इंडिया मोहिमेचा हिस्सा आहे.

रणनीतिक शक्ती वाढणार : हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रुत्व बाळगून असलेल्या शेजारी देशांच्या विरोधात रणनीतिक आघाडी मिळवून देणारे आहे. हे शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला भेदण्याची क्षमता बाळगून आहे.

Advertisement
Tags :

.