भारतात लवकरच धावणार हायड्रोजन रेल्वे
चालू वर्षाच्या अखेरीस परीक्षण शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात लवकरच हायड्रोजनने संचालत रेल्वे धावणार आहे. जर्मनीची टीयुव्ही-एसयुडी रेल्वेवरून सुरक्षेसाठी ऑडिट करविणार आहे. डिसेंबर महिन्यातच हायड्रोजन रेल्वेचे परीक्षण होऊ शकते. यामुळे भारत हा जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनच्या श्रेणीत सामील होणार आहे. या देशांमध्ये यापूर्वीच हायड्रोजन रेल्वेचे संचालन केले जात आहे.
याचबरोबर हायड्रोजन फ्यूल सेल आधारित टॉवर कार देखील निर्माण केली जाणार आहे. याच्या एका युनिटकरता 10 कोटीपेक्षा अधिक खर्च येणार आहे. भारतीय रेल्वे प्रथम 35 रेल्वेगाड्यांचे संचालन करणार आहे. एका रेल्वेगाडीकरता 80 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर याचे ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यास देखील 70 कोटी रुपये खर्च होणार आहेत. सिस्टीम एकीकृत युनिट बॅटरी आणि दोन फ्यूल इनिटचे परीक्षण यशस्वीपणे करण्यात आले आहे.
पहिली हायड्रोजन रेल्वे जींद-सोनीपत मार्गावर धावू शकते. हरियाणात रेल्वेसाठी हायड्रोजन 1 मेगावॅट पॉलीमर इलेक्ट्रोलाइट मेंब्रेन इलेक्ट्रोलाइजरकडून प्राप्त होईल, जे जींदमध्ये स्थापित असेल. तेथे प्रतिदिन सुमारे 430 किलोग्रॅम हायड्रोजन तयार केला जाणार आहे. तेथे 3 हजार किलोग्रॅम हायड्रोजन स्टोरेजची देखील क्षमता असणार आहे.
काय आहेत वैशिष्ट्यो
हायड्रोजन रेल्वे ही हायड्रोजन इंधनाद्वारे संचालित होते. यात इंजिनच्या जागी हायड्रोजन फ्यूल सेल्स लावले जातात. या रेल्वे कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन किंवा पार्टिक्युलेट मॅटर यासारखे प्रदूषक उत्सर्जित करत नाहीत. यामुळे प्रदूषण होणार नाही. हायड्रोजन फ्यूल सेल्सच्या मदतीने हायड्रोजन फ्यूलचा वापर करत वीज निर्माण केली जाते. अशाप्रकारच्या रेल्वेला हायड्रेल देखील म्हटले जाते. या रेल्वेत चार डबे असू शकतात. या रेल्वेला नीलगिरी माउंटेन रेल्वे, दार्जिलिंग हिमालयन, कालका शिमला रेल्वे, कांगडा खोरे आणि बिलमोरा वाघई आणि मारवाड देवगढ मदारिया मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. ही रेल्वे 140 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणार आहे. कपुरथळा आणि इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत ही रेल्वे तयार केली जात आहे.
डिझेल रेल्वेच्या तुलनेत या रेल्वेच्या संचालनाचा खर्च अधिक असणार आहे. परंतु पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून ही रेल्वे लाभदायक आहे. या रेल्वेचे संचालन डिझेल रेल्वेपेक्षा 27 टक्के महाग ठरू शकते. सर्वप्रथम फ्रान्सच्या कंपनीने हायड्रोजन रेल्वेची निर्मिती केली होती. 2018 पासून तेथे हायड्रोजन रेल्वे धावत आहे.