For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘केकेआर’समोर आज हैदराबादचे आव्हान

06:39 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘केकेआर’समोर आज हैदराबादचे आव्हान
Advertisement

दोन्ही संघांसमोर गोलंदाजीच्या समस्या, कोलकातासाठी घरच्या मैदानावरील सामन्यांच्या मालिकेची सुरुवात

Advertisement

वृत्तसंस्था  / कोलकाता :

आज गुऊवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबादविऊद्ध होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा धार दाखवावी अशी तीव्र इच्छा असेल. दोन्ही संघ फलंदाजीत बलाढ्या आहेत. हा सामना म्हणजे तीन वेळच्या विजेत्या संघासाठी  घरच्या मैदानातील सामन्यांच्या मालिकेची महत्त्वपूर्ण सुऊवात देखील आहे.

Advertisement

आगामी विधानसभा निवडणुकांमुळे कोलकातामधील सामने जवळपास महिनाभर थांबण्यापूर्वी हा संघ सात दिवसांत तीन सामने आणि 19 एप्रिल रोजी आणखी एक सामना खेळणार आहे. यानंतर चार दूरस्थ सामने आणि पुढचा घरच्या मैदानावरचा सामना 16 मे रोजी होणार असल्याने केकेआरला या टप्प्यात लय कायम ठेवणे अत्यावश्यक आहे हे माहीत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ईडन गार्डन्स हा केकेआरचा बालेकिल्ला राहिलेला आहे, जिथे त्यांनी 2008 पासून खेळलेल्या 95 सामन्यांपैकी 54 सामने जिंकले आहेत.

मात्र गोलंदाजीतील कमतरतेमुळे केकेआरच्या वाटचालीत काही अडथळे आले आहेत. त्यांनी एक संतुलित वेगवान गोलंदाजी आक्रमण तयार केले आहे असे वाटत होते, परंतु दुखापती आणि गोलंदाजांच्या उपलब्धतेच्या बाबतीत समस्यांमुळे त्यांची धार बोथट झाली आहे. हर्षित राणा आणि आकाश दीप संघाबाहेर आहेत, मथिशा पाथिरानाला श्रीलंका क्रिकेटकडून अद्याप ना हरकत दाखला मिळालेला नाही आणि 25.20 कोटी ऊपयांना संघात घेतलेला कॅमेरून ग्रीन सध्या केवळ फलंदाज म्हणून उपलब्ध आहे. मुंबई इंडियन्सविऊद्धच्या सलामीच्या सामन्यात संघातील ही कमतरता प्रकर्षाने दिसून आली, जिथे ते 220 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरले.

त्याशिवाय मोठी चिंता फिरकी गोलंदाजांची म्हणजे सुनील नरेन आणि वऊण चक्रवर्ती यांच्या धडपडीची असेल. चक्रवर्तीला पहिल्या सामन्यात एकही बळी मिळाला नाही आणि त्याने 48 धावा दिल्या, तर नरेनने केवळ तीन षटके टाकली आणि त्याला पॉवरप्लेनंतरच गोलंदाजीसाठी आणण्यात आले. 10 चेंडूंमध्ये 18 धावा करणाऱ्या ग्रीनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’च्या सूचनांनुसार गोलंदाजी केली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या रोव्हमन पॉवेलची सिद्ध झालेली टी-20 कारकीर्द पाहता केकेआर त्याला संघात घेण्याचा विचार करते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

केकेआरने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीची मागणी केली असली, तरी खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज या दोघांनाही मदत करणारी आणि सरासरी 200 धावा निघू शकणारी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेन आणि चक्रवर्ती यांना चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या स्फोटक सुऊवातीमुळे केकेआरला दिलासा मिळेल, परंतु मधल्या षटकांमध्ये त्याची संथ गती ही चिंतेची बाब आहे.

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरकडून पराभवाने आपल्या मोहिमेची सुऊवात केल्यानंतर सनरायझर्स संघही अशाच परिस्थितीत सापडला आहे. या संघात अभिषेक शर्मा, इशान किशन आणि ट्रॅव्हिस हेड यासारखे स्टार खेळाडू आहेत. पण त्यांची गोलंदाजी विशेषत: पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत कमकुवत दिसत आहे. कारण ते आरसीबीविऊद्ध 201 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरले. पहिल्या सामन्यात नितीशकुमार रे•ाr, जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि ईशान मलिंगा यासारख्या गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी संघर्ष करावा लागला. मागील सामन्यात अभिषेक आणि हेड स्वस्तात बाद झाल्यामुळे हैदराबादला आपल्या आघाडीच्या फळीकडून अधिक अपेक्षा असतील.

संघ : कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, फिन ऍलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, सार्थक रंजन, टिम सेफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, कॅमेरून ग्रीन, सुनील नरेन, रचिन रवींद्र, वऊण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, ब्लेसिंग मुजाराबानी, नवदीप सैनी, प्रशांत सोळंकी आणि उमरान मलिक.

सनरायझर्स हैदराबाद : इशान किशन (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मरण, हेन्रिक क्लासेन, नितीशकुमार रे•ाr, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, झीशान अन्सारी, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, सलिल अरोरा, शिवांग कुमार, ओंकार तरमाळे, क्रेन्स फुलेत्रा, प्रफुल हिंगे, अमित कुमार, साकिब हुसेन, जॅक एडवर्ड्स आणि पॅट कमिन्स.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.