महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार: भाजपाची मोठी घोषणा

04:35 PM Nov 27, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर ला मतदान होणार आहे.यासाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ-मोठी आश्वासने देत आहेत. दरम्यान, भाजपने सोमवारी हैदराबादचे नाव बदलून भाग्य नगर करण्याची मोठी घोषणा केली आहे.

Advertisement

“तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास हैदराबादचे नाव बदलले जाईल. मी विचारतो, हैदर कोण आहे? हैदर नावाची गरज आहे का? हैदर कुठून आला? हैदरची गरज कोणाला? भाजप सत्तेत आल्यास निश्चितपणे हैदर नाव काढून टाकले जाईल आणि शहराचे नाव बदलून भाग्यनगर केले जाईल." असे तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी म्हणाले आहेत.

Advertisement

रेड्डी पुढे म्हणतात की, "मद्रासचे नाव बदलून चेन्नई, बॉम्बेचे मुंबई, कलकत्ता ते कोलकाता आणि राजपथचे नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आले आहे, तर हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्यात काय हरकत आहे? भाजप सत्तेवर आल्यास आम्ही त्या सर्व गोष्टी बदलू, ज्यातून गुलामगिरीची मानसिकता दिसून येते. भाजप नाव बदलण्याबाबत अभ्यासकांचे मतही घेणार आहे.याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही तेलंगणातील निवडणूक रॅलींमध्ये हैदराबादचे भाग्यनगर आणि महबूबनगरचे नाव पलामुरु करण्याबाबत वक्तव्य केले आहे.

 

Advertisement
Tags :
#bhagyanagarbhajapadeclareHyderabadrenamedtarunbharat
Next Article