हैद्राबादमध्ये एका पबमध्ये डान्सर म्हणून काम करणाऱ्या महिलेचा मृतदेह रहस्यमयी अवस्थेत सापडला आहे. शहरातल्या लंगर हौझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री एका २६ वर्षीय क्लब डान्सर महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूपूर्वी या महिलेने बिर्याणी मागवली होती त्यानंतर तिने एका मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला होता, त्यामुळे महिलेच्या मृत्यूने गूढ निर्माण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेने तिच्या मैत्रीणीशी उद्या वाढदिवसाच्या नियोजनाचीही चर्चा केली. तसेच तिने या व्हिडिओ कॉलदरम्यान एका 'भेटवस्तू'चा उल्लेख केला पण दुर्देवाने दुसऱ्याच दिवशी, त्या २६ वर्षीय महिलेने हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली .
प्रियकरासोबत गेली होती हॉटेलमध्ये
मिळालेल्या माहितीनुसार ती संध्याकाळी तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये दाखल झाली होती .एका पबमध्ये भेटल्यानंतर ते दोघे गेल्या सहा महिन्यांपासून नात्यात होते, असे वृत्तसंस्था एएनआयने लँगर हाऊस पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे.
वाढदिवस, भेटवस्तू, आणि मग आत्महत्या
कुकटपल्ली येथील 'किंग्स अँड क्वीन्स'या पबमध्ये क्लब डान्सर म्हणून काम करणारी ही महिला बोलारामची रहिवासी असून, पूर्वी ती मुकाबोवली येथे राहत होती, असे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, तिचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले असून तिला सात वर्षांचा मुलगा आहे, परंतु ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती.
सहा महिन्यांपूर्वी ती एका पबमध्ये एका पुरुषाला भेटली आणि त्याच्यासोबत तिचे नातेसंबंध जुळले, असे लँगर हाउझ पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा :Crime News : दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी टाकून मातेने जीवन संपवले
आधी बिर्याणी मागवली आणि नंतर ...
गोलकोंडा भागातील रहिवासी असलेला तो माणूस गुरुवारी संध्याकाळी पीडितेसोबत व्ही ग्रँड हॉटेलच्या खोलीत आला होता, पण नंतर निघून गेला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर त्या दोघांनी बिर्याणी मागवली आणि त्यानंतर तो माणूस एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निघून गेला.
रात्री सुमारे साडेबारा वाजता, नंतर, त्या महिलेने कथितरित्या दुसऱ्या एका मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस असल्याचे सांगून, "माझ्याकडे तुझ्यासाठी वाढदिवसाची भेट आहे," असे म्हटले.
नंतर ती हॉटेलच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या महिलेचा प्रियकरही विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो सध्या चौकशीसाठी पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये हलवला.