For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौसमोर आज हैदराबादचे कडवे आव्हान

06:51 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
लखनौसमोर आज हैदराबादचे कडवे आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/   हैदराबाद :

Advertisement

रविवारी हैदराबादमध्ये होणाऱ्या एका अवघड आयपीएल सामन्यात स्फोटक सनरायझर्स हैदराबादविऊद्ध या हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी लखनौ सुपर जायंट्सला आपल्या फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा 65 धावांनी धुव्वा उडवताना हैदराबादने 8 बाद 226 धावा काढल्या होत्या. फलंदाजीतील लय पुन्हा मिळवल्यामुळे ते या हंगामातील आपल्या पहिल्या घरच्या सामन्यात पूर्ण आत्मविश्वासाने उतरतील. या दुपारच्या सामन्यातील खेळपट्टी फटकेबाजीसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलएसजीसमोरील आव्हान आणखी वाढले आहे.

एलएसजीच्य यावेळच्या मोहिमेची सुऊवातही आशादायक झालेली नाही. त्यांना संसाधनांची कमतरता जाणवत नाही. जस्टिन लँगर प्रशिक्षित या संघात ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार मिचेल मार्श, दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम, कर्णधार रिषभ पंत आणि स्फोटक फलंदाज निकोलस पूरन यांचा समावेश असलेली एक मजबूत फलंदाजी फळी आहे. मात्र एकना येथील त्यांच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात 19 षटकांपेक्षा कमी वेळेत 141 धावांवर संघाची झालेली पडझड ही त्यांच्यातील गंभीर त्रुटी उघड करणारी ठरली.

Advertisement

सलामीला येण्याचा प्रयोग फसल्याने रिषभ पंत आज पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. पूरननेही या भूमिकेत प्रभावी कामगिरी केली आहे, परंतु विंडीजच्या या स्टार खेळाडूला मधल्या षटकांची जबाबदारी सांभाळावी लागू शकते. फलंदाजीत ताळमेळाचा अभाव असल्याने एलएसजीने मार्श-मार्करम ही सलामीची जोडी पुन्हा प्रस्थापित करणे आणि पंतला मधल्या फळीत स्थान देणे शहाणपणाचे ठरेल. गोलंदाजी हीच त्यांची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. मोहम्मद शमीने युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवच्या सोबतीने नव्या चेंडूवर केलेल्या आपल्या जुन्या शैलीतील गोलंदाजीने सर्वांना भूतकाळात नेले. परंतु एलएसजीला मधल्या षटकांमध्ये तो दबाव कायम राखता आला नाही. तसेच गूढ लेगस्पिनर दिग्विजय राठी याला संघातून वगळण्याचा निर्णयही चर्चेचा विषय बनला असून येथील खेळपट्टीवरही ते त्याच्याशिवाय खेळणे कायम ठेवतात की नाही हे पाहणे रंजक ठरेल.

संघ : सनरायझर्स हैदराबाद : ईशान किशन (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मरण, हेनरिक क्लासेन, नितीशकुमार रे•ाr, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, एहसान मलिंगा, झीशान अन्सारी, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, सलिल अरोरा, शिवांग कुमार, ओंकार तरमाळे, क्रेन्स फुलेत्रा, प्रफुल्ल हिंगे, अमित कुमार, साकिब हुसेन, जॅक एडवर्ड्स आणि पॅट कमिन्स.

लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), आयुष बदोनी, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्करम, निकोलस पूरन, अर्शिन कुलकर्णी, मिशेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश महाराज सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंह राठी, अर्जुन तेंडुलकर, मयंक प्रभू यादव, वानिंदू हसरंगा, अॅनरिच नॉर्टजे, जोश इंग्लिस, अब्दुल समद, हिम्मत सिंग, नमन तिवारी, अक्षत रघुवंशी, मोहसीन खान, मणिमरन सिद्धार्थ, मुकुल चौधरी.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.

Advertisement
Tags :

.