हैदराबाद-कोलकाता सामना चुरशीचा ठरण्याची चिन्हे
केकेआर पुनरागमनाच्या वाटेवर, हैदराबाद विजयाची मालिका कायम ठेवण्याच्या प्रयत्नात
वृत्तसंस्था
हैदराबाद : फलंदाजीची एक अत्यंत आक्रमक फळी आपल्या ताफ्यात असताना सनरायझर्स हैदराबाद आज रविवारी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात पुनरागमनाच्या वाटेवर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करताना आपली विजयाची मालिका कायम राखण्याचा आणि गुणतालिकेत वरची झेप घेण्याचा प्रयत्न करेल.
हैदराबाद सध्या सलग पाच सामने जिंकण्याच्या मालिकेत आहे. नऊ सामन्यांतून 12 गुण मिळवत ते आयपीएल गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत, यामध्ये सहा विजय आणि तीन पराभवांचा समावेश आहे. दुसरीकडे, केकेआर संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हंगामात संघर्ष करत राहिलेला असला, तरी त्यांनी त्यांचे मागील दोन सामने जिंकले आहेत. 10 संघांच्या या स्पर्धेत ते सध्या आठव्या स्थानावर आहेत.
हैदराबादकडे फलंदाजीची एक भक्कम फळी उपलब्ध आहे, ज्यामध्ये या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अभिषेक शर्मा आणि हेन्रिक क्लासेन यांचा समावेश आहे. ईशान किशनच्या रूपाने त्यांच्याकडे आणखी एक स्फोटक फलंदाज आहे, जो कोणत्याही दिवशी सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता बाळगतो. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यानेही मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविऊद्ध 76 धावांची खेळी करत पुन्हा एकदा धावांचा ओघ सुरू केला आहे. या सामन्यात हैदराबादने 243 धावांचे विशाल लक्ष्य गाठताना 18.4 षटकांत हाती सहा गडी राखून विजय मिळवला होता. नितीशकुमार रे•ाr आणि सलिल अरोरा यांनीही जेव्हा जेव्हा संघाला गरज भासली, तेव्हा फलंदाजीतून मोलाची कामगिरी बजावली आहे.
हैदराबादच्या फलंदाजी फळीची आक्रमक ताकद पाहता त्यांना रोखण्यासाठी केकेआरच्या गोलंदाजी विभागाला आपल्या कामगिरीचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचवावा लागेल. गोलंदाजीच्या आघाडीवर हैदराबादला त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स संघात परतल्यामुळे मोठी बळकटी मिळाली आहे. कमिन्सव्यतिरिक्त प्रफुल हिंगे, ईशान मलिंगा, रे•ाr आणि साकिब हुसेन यांनीही आपापली भूमिका चोख बजावली आहे. पहिल्या टप्प्यातील सामन्यात ईडन गार्डन्सवर केकेआरचा 65 धावांनी पराभव केल्यामुळे हैदराबादचा आत्मविश्वासही सध्या उंचावलेला असेल.
हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे. कारण पाच पराभव आणि एक पावसामुळे रद्द झालेला सामना यानंतर सलग दोन विजय मिळवत केकेआर संघ आता पुनरागमनाच्या वाटेवर आहे. केकेआर अखेर रचिन रवींद्रचा आपल्या रणनीतीत समावेश करून घेतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, कारण आतापर्यंत त्याला केवळ बाकावरच राखीव खेळाडू म्हणून बसावे लागले आहे. फिन अॅलन आणि टीम सेफर्ट हे देखील अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत, तर अंगक्रिश रघुवंशी, कॅमेरून ग्रीन आणि रोव्हमन पॉवेल यासारख्या खेळाडूंना अद्याप आपली चमक दाखवता आलेली नाही. केकेआरला आपल्या कमकुवत वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा आणि फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या वऊण चक्रवर्तीच्या संथ सुऊवातीचा फटका बसला आहे.
संघ : सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेन्रिक क्लासेन, नितीशकुमार रे•ाr, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, एशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे.
कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, कॅमेरॉन ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वऊण चक्रवर्ती, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी.
सामन्याची वेळ: दुपारी 3.30 वा.