For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबादचा राजस्थानावर 5 गड्यांनी विजय

06:55 AM Apr 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
हैदराबादचा राजस्थानावर 5 गड्यांनी विजय
Advertisement

वैभवचे जलद शतक वाया, इशान किशन, अभिषेक यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था, जयपूर

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 9 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात राजस्थानतर्फे वैभव सूर्यवंशीने नोंदविलेले जलद शतक वाया गेले. तर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या समयोचित अर्धशतकांनी हैदराबादला विजय मिळवून दिला. या विजयामुळे हैदराबादने गुणतक्त्यात दहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून राजस्थान 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. इशान किसनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Advertisement

या स्पर्धेतील हा 36 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळविला गेला. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. वैभव सूर्यवंशीचे जलद शतक तसेच ध्रुव जुरेलच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 बाद 228 धावा जमविल्या. पण विजयाला या धावा पुरेशा ठरल्या नाहीत. हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि इशान किशन तसेच नितीशकुमार रेड्डी आणि क्लासन यांच्या आकर्षक फटकेबाजीमुळे हैदराबादने 18.3 षटकांत 5 बाद 229 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला.

जयस्वाल आणि सूर्यवंशी यांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक टोलेबाजी सुरू केली. पण जयस्वालला फलंदाजीचा सूर मिळाला नाही. तत्पूर्वी वैभवने पहिल्याच षटकांत 4 षटकार ठोकले. मलिंगाने जयस्वालला क्लासनकरवी झेलबाद केले. त्याने 8 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविताना वैभवसमवेत सलामीच्या गड्यासाठी 14 चेंडूत 40 धावांची भागिदारी केली.

सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांनी धावांचा वेग चांगलाच वाढविला. सूर्यवंशीने केवळ 15 चेंडूत 7 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने जलद अर्धशतक पूर्ण केले. ज्युरेलने 35 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 51 धावा झळकविल्या. रेड्डीने त्याला झेलबाद केले. सूर्यवंशी आणि ज्युरेल यांनी दुसऱ्या गड्यासाठी62 चेंडूत 112 धावांची शतकी भागिदारी केली. कर्णधार रियान पराग केवळ 7 धावांवर बाद झाला. वैभवने 36 चेंडूत 12 षटकार आणि 5 चौकारांसह शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यानंतर तो साकीब हुसेनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 103 धावा झळकविल्या. फरेराने 16 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 33, हेटमायरने 1 चौकारासह 10 धावा केल्या. राजस्थानच्या डावात 16 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. राजस्थानने पॉवरप्ले दरम्याच्या 6 षटकांत 76 धावा जमविताना 1 गडी गमविला. हैदराबादतर्फे मलिंगाने 2 तर प्रफुल्ल हिंगे, कमिन्स, साकीब हुसेन आणि नितीशकुमार रे•ाr यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना सलामीचा हेड पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 132 धावांची शतकी भागिदारी केली. अभिषेकने 29 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 57 धावा तर इशान किशनने 31 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह 74 धावा झळकविल्या. क्लासनने 24 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29 तर नितीशकुमार रेड्डीने 18 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 36 धावा केल्या. सलील अरोराने अखेर विजयी षटकार मारुन राजस्थानचे आव्हान 9 चेंडू बाकी 5 गड्यांनी संपुष्टात आणले. राजस्थानच्या डावात 10 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. हैदराबादने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 89 धावा जमविताना एकमेव गडी गमविला. राजस्थानतर्फे आर्चर आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर फरेराने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 6 बाद228 (वैभव सूर्यवंशी 103, ज्युरेल 51, फरेरा 33, हेटमायर 11, अवांतर 7, मलिंगा 2-38, हिंगे, कमिन्स, साकीब हुसेन आणि नितीशकुमार रेड्डी प्रत्येकी 1 बळी), सनरायझर्स हैदराबाद 18.3 षटकांत 5 बाद 229 (इशान किशन 74, अभिषेक शर्मा 57, नितीशकुमार रेड्डी 36, क्लासन 29, अवांतर 18, आर्चर व ब्रिजेश शर्मा प्रत्येकी 2 बळी, फरेरा 1-14).

वैभव सूर्यवंशीचे आयपीएलमधील दुसरे शतक

आयपीएलमधील वैभवचे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक

Advertisement
Tags :

.