For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुतात्मा परिवार व धरणग्रस्त धैर्यशील मानेंच्या पाठीशी- गौरव नायकवडी

03:07 PM Apr 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
हुतात्मा परिवार व धरणग्रस्त धैर्यशील मानेंच्या पाठीशी  गौरव नायकवडी
Gaurav Nayakwadi
Advertisement

आमदार विनय कोरेंच्या उपस्थितीत वाळवा येथे मेळावा

वाळवा / प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हुतात्मा संकुल व शेतकरी कामगार धरणग्रस्त यांचा संवाद मेळावा कामगार भवन वाळवा येथे वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या वेळी हुतात्मा संकुलातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. वाळवा तालुक्यांचे युवा नेते हुतात्मा साखर कारखान्याचे संचालक, हुतात्मा सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी पद्मभूषण क्रां. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी व लोकनेते बाळासाहेब माने यांचे जिव्हाळ्dयाचे संबंध होते. तसेच हुतात्मा कारखान्याच्या उभारणीमध्ये लोकनेते बाळासाहेब माने यांनी सहकार्य केले होते याची आठवण करून दिली. भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 400 पार हे स्वप्न साकार करण्यासाठी हुतात्मा संकुल भक्कमपणे पाठीशी राहील. त्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

Advertisement

यावेळी कोरोना नंतरच्या दोन वर्षात खासदार देशील माने यांनी जास्तीत जास्त फंड हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी खेचून आणला आहे. वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावात खासदार धैर्यशील माने यांनी विकास कामे केली असल्याचे सांगून विकासासाठी खासदार धैर्यशील माने यांना निवडून द्या, असे आवाहन आमदार विनय कोरे यांनी केले.

यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्य समिती सदस्य सम्राट बाबा महाडिक, माजी जि.प.सदस्य भीमराव अण्णा माने, सी. बी. आप्पा पाटील, स्वरूपराव पाटील, केदार नायकवडी, विकास माने, वाळव्याचे सरपंच संदेश कांबळे, माजी चेअरमन महादेव कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष नंदू पाटील, माजी उपसरपंच पोपटतात्या अहिर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.....

Advertisement

Advertisement
Tags :

.