पती-पत्नीचे भांडण, रेल्वेला 3 कोटीचा फटका
वृत्तसंस्था/विलासपूर
पती-पत्नींमध्ये भांडणं होणं सामान्य बाब आहे. परंतु छत्तीसगड येथे राहणाऱ्या महिलेचे पतीसोबत भांडण झाले असता रेल्वेला तीन कोटीचे नुकसान झाले आहे. महिलेचा पती रेल्वेमध्ये स्टेशनमास्तर आहे. फोनवरील भांडणाची अखेर ‘ओके’ने झाली असता दुसऱ्या लाइनवर असलेल्या स्टेशनमास्तरने याला सिग्नलचा ‘ओके’ समजण्याची चूक केली. यानंतर रेल्वेला बॅन रुटवर धावण्याचा सिग्नल देण्यात आल्याने रेल्वेचे नुकसान झाले आहे. पत्नीच्या छळामुळे कंटाळलेल्या पतीने न्यायालयात धाव घेतली असून आता घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महिलेचा पती विशाखापट्टणममध्ये रेल्वे स्टेशनमास्तर आहे. महिला छत्तीसगडमध्ये राहणारी आहे. दोघांचाही विवाह 12 ऑक्टोबर 2011 रोजी झाला होता. परंतु त्यांचे नाते सुरळीत नव्हते, महिलेचे अन्य कुणासोबत अफेयर सुरू असल्याचे पतीचे सांगणे होते. ती पतीसमोरच प्रेमीसोबत बोलत होती. यावरून दोघांमध्ये भांडणं व्हायची. स्टेशनमास्टर पती ड्यूटीवर असताना दोघांमध्ये फोनवरून भांडण सुरू झाले होते.
‘ओके’मुळे गफलत
ड्यूटीवर तैनात स्टेशन मास्तरचे फोनवरून पत्नीसोबत भांडण सुरू होते. याचदरम्यान तेथून रेल्वे जाणार होती. वाद थांबत नसल्याचे पाहून पतीने पत्नीला घरात आल्यावर बोलुया असे सांगितले. यानंतर कॉल ठेवण्यासाठी ओके म्हटले. दुसऱ्या स्टेशनमास्तरने हा ओके रेल्वेसाठी असल्याचे समजत रेल्वेला बॅन रुटवर जाऊ दिले. यामुळे रेल्वेला मोठा झटका बसला. सुमारे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. या घटनेनंतर स्टेशनमास्तरला रेल्वेने निलंबित केले आहे.