For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टॉयलेट क्लीनर इंजेक्ट करत पतीची हत्या

06:27 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
टॉयलेट क्लीनर इंजेक्ट करत पतीची हत्या
Advertisement

पत्नी होती नर्स : विवाहबाह्या संबंधांमुळे काढला काटा

Advertisement

वृत्तसंस्था, निजामाबाद

तेलंगणात एका नर्सने प्रियकरासोबत मिळून 35 वर्षीय पतीची हत्या केली आहे. पोलिसांनुसार महिलेने 30 जून रोजी पतीला छतावरून धक्का देत ठार करण्याचा प्रयत्न केला होता. यातून तो बचावल्यावर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याच्या नसांमध्ये लावलेल्या ड्रिपमध्ये टॉयलेट क्लीनर इंजेक्ट करत त्याचा जीव घेण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिला 32 वर्षीय संध्या, तिचा प्रियकर  अनिल आणि त्याचा मित्र वेंकट साई यांना अटक केली आहे. ही हत्या पूर्वनियोजित कटाद्वारे करण्यात आली आहे. संध्याचे विवाहबाह्या संबंध या हत्येसाठी कारणीभूत ठरले आहेत. ही पूर्ण घटना निजामाबाद जिल्ह्याच्या मोपाल तालुक्यातील न्यालाकर गावात घडली आहे.

प्रशांत अलिकडेच आखाती देशामधून परतला होता, मायदेशी परतल्यावर त्याल संध्याच्या विवाहबाह्या संबंधांविषयी कळले होते, यामुळे पतीपत्नींमध्ये भांडणे होऊ लागली होती. 30 जून रोजी संध्या, तिचा प्रियकर अनिल आणि वेंकट साई यांनी मिळून प्रशांतला भरपूर मद्य पाजले होते. त्यानंतर मारहाण करत घराच्या छतावरून खाली ढकलून दिले होते. परंतु गंभीर जखमी होऊनही प्रशांतचा जीव वाचला होता. प्रशांत मद्यधुंद अवस्थेत स्वत:च छतावरून कोसळल्याचे सांगत आरोपींनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते.

उपचारादरम्यान टॉयलेट क्लीनर इंजेक्ट

संध्याने एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम केले होते. तिने स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करत उपचारादरम्यान पतीच्या ड्रिपमध्ये टॉयलेट क्लीनर आणि एनेस्थीसिया इंजेक्ट केले होते.

आईला आला संशय

प्रशांतच्या मृत्यूबद्दल त्याच्या आईला संशय आला होता. तिने 1 जुलै रोजी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार नोंदविली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता कटाचा खुलासा झाला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यावर रहस्याची उकल झाली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संध्याने स्वत:चा गुन्हा मान्य केला.  पोलिसांनी संध्या तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. तर चौकशीत वेंकट साईने देखील हत्येच्या पहिलया प्रयत्नातील स्वत:ची भूमिका मान्य केली आहे.

Advertisement

.