कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पत्नीला जेवणाचा डबा घेऊन जाताना पतीवर काळाचा घाला

05:25 PM Apr 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

बेडग :

Advertisement

बेडग (ता. मिरज) येथे रिक्षा, ट्रॅक्टर आणि दुचाकीचा तिहेरी अपघात होऊन ट्रॅक्टरखाली सापडून एकजण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. पांडूरंग आनंदराव पवार (वय 32, रा. शिंदेवाडी) असे मृताचे नांव आहे. मिरजेतील एका खासगी ऊग्णालयात उपचार घेणाऱ्या पत्नीला ते जेवणाचा डबा घेऊन जात होते. मात्र, रस्त्यातच अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा कऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, संबंधीत ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

ग्रामीण पोलीस तसेच घटनास्थळावऊन मिळालेली माहिती अशी, पांडूरंग पवार हे दुचाकी (एमएच-09-एए-1086) वऊन बेडगहून मिरजेकडे होते. ते बोलवाड फाट्याजवळ आले असता समोऊन ट्रॅक्टर (एमएच-10-डीआय-0414) मिरजेकडेच जात होती. पवार हे ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होते. मिरजेहून बेडगकडे एक रिक्षा जात असताना पवार यांनी दुचाकी रस्त्याकडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटून अपघात झाला. तितक्यात पाठीमागून आलेला ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर गेला. यामध्ये गंभीर जखमी होऊन पवार यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातस्थळी ट्रॅक्टर थांबून होता. मात्र, रिक्षा चालक निघून गेला. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. शासकीय ऊग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत मयताची ओळख पटत नव्हती. त्यांच्याजवळ खिशात असलेल्या काही कागदपत्रांवऊन घरच्यांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यानंतर ओळख पटवून रात्री उशिरापर्यंत पंचनामा कऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, चौकशीसाठी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आले होते.

सध्या मिरज-बेडग-आरग-लिंगनूर या रस्त्याचे ऊंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खुदाई करण्यात आली आहे. वारंवार माती व मुरूम वाहतुकीमुळे रस्त्यावरील साईट पट्ट्याही दिसत नाहीत. शिवाय अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकही नाहीत. वाहनांची सर्रासपणे बेशिस्त वर्दळ सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरमुळे वाहतूक कोंडी होत असून, समोऊन जाणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करणे जीवावर बेतत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे.

 पवार यांच्या पत्नीही आजारी असल्याने त्यांना मिरजेतील एका खासगी ऊग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर पत्नीसाठी जेवणाचा डबा घेऊन पवार हे गावाकडून मिरजेकडे येत होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. आजारी पत्नीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पतीवर काळाने घाला घातल्यामुळे घटनास्थळी तसेच शिंदेवाडी गावात हळहळ व्यक्त होत होती.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article