कोथळीत त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
पत्नीसह प्रियकराविरोधात खडकलाट पोलिसात गुन्हा : शेकडो नागरिकांची स्थानकाकडे धाव
वार्ताहर /खडकलाट
पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातून होणाऱ्या वादातून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या करुन घेतल्याची घटना चिकोडी तालुक्यातील कोथळी येथे घडली. दरम्यान पत्नी आणि त्याच्या प्रियकराला अटक करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कोथळी येथील शंभरहून अधिक नागरिकांनी खडकलाट पोलीस स्थानकासमोर जमा होऊन केली. यासंबंधी मृताच्या भावाने मृताची पत्नी आणि त्याच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश राजू गोटूरे (वय 36) असे दुर्देवी युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी, प्रकाश राजू गोटूरे हा ट्रकवर चालक असून ता गोटूरे गल्लीत रहात होता. त्याचा विवाह सारिका हेब्बाळ हिच्यासोबत 8 वर्षांपूर्वी झाला आहे. त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. दरम्यान सारिका हिचे गावातीलच संतोष नामक तरुणांसोबत अनैतिक संबंध होते. यात अडथळा ठरणाऱ्या पतीला झोपेची गोळी देण्यासह त्याचा मानसिक त्रास सारिका करीत होती. सदर अनैतिक संबंधाबाबत प्रकाश याला माहिती मिळाल्यानंतर पती-पत्नी मध्ये रोज भांडण होत होती. सोमवार 6 रोजी रात्री 10 वाजता वाद झाला.
त्यामुळे प्रकाशने आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन पत्नीला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करून घेत होता. दरम्यान घरासमोर असलेल्या एकाने प्रकाश गळफास घेत असल्याचे पाहून पळत जात दोरी कापून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला चिकोडी रुग्णालय यानंतर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याला खाजगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण उपचार सुरु असताना रविवार 12 रोजी प्रकाशचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खडकलाट पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षिका अनिता राठोड या घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केले. पंचनामा करून मृतदेह नातेवाहिकांच्या ताब्यात दिला. दरम्यान प्रकाश गोटूरे हा चांगला व मनमिळाऊ होता. त्याच्या पत्नीने प्रियकर संतोष व आई सुधाराणी बागडे (हेब्बाळ) यांच्या सहकार्याने प्रकाशला आत्महत्या करून घेण्यासाठी प्रवृत्त केले आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आल्याची तक्रार प्रकाश यांचा भाऊ प्रदीप राजू गोटूरे यांनी खडकलाट पोलीस स्थनकात केली आहे. प्रकाश याला आत्महत्या करून घेण्यासाठी प्रवृत्त केलेल्या त्याची पत्नी, प्रियकर व सासूला कठीण शिक्षा द्यावी या मागणीसाठी कोथळी येथील सुमारे शंभरपेक्षा अधिक नागरिक खडकलाट पोलीस स्थानकासमोर सोमवारी जमा झाले होते. संतोष व सारिका यांना पोलीस स्थानकात आणले होते. रात्री उशिरापर्यंत सदर घटनेबाबत कार्यवाही सुरु होती.