For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाल्कनीतून फेकलेला बॉल पकडणारा पती

06:42 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाल्कनीतून फेकलेला बॉल पकडणारा पती
Advertisement

जर तुम्ही जुनी चिनी चित्रपट पहात असाल तर कधी एक असे दृश्य पाहिले असेल, ज्यात एखादी महिला बाल्कनीतून खाली एक बॉल फेकते, हा बॉल जो पकडतो, तोच या महिलेचा पती होतो. चीनमधील ही परंपरा अत्यंत वेगळी वाटते. ही प्राचीन परंपरा आजही काही समुदायांमध्ये पाळली जाते.

Advertisement

कढाई असलेला चेंडू फेकण्याची परंपरा चीनमध्ये राहिली आहे, परंतु आता बाल्कनीतून तो फेकून एखाद्या अनोळखी इसमाला पती निवडण्याची प्रथा आता नाही. आता सर्वकाही निश्चित पद्धतीने होते. दक्षिण चीनच्या गुआंग्शी येथे राहणाऱ्या झुआंग समुदायामध्ये हा चेंडू प्रेम व्यक्त करण्याची एक पारंपरिक पद्धत राहिला आहे. यात एकमेकांना पसंत करणारे युवक-युवती चेंडू फेकत होते. आता हे रँडमली होत नाही.

जुन्या चिनी कादंबऱ्या आणि पीरियड ड्रामामध्ये कढाईयुक्त चेंडूद्वारे पती निवडण्याचा किस्सा अनेकदा दिसून येतो. 16 व्या शतकात लिहिण्यात आलेली प्रसिद्ध कादंबरी ‘जर्नी टू द वेस्ट’मध्ये देखील असाच प्रसंग आहे. यात मुख्य पात्र श्वेनजांगच्या पित्याची निवड त्याची आई चेंडू फेकूनच करते, याच घटनेद्वारे पूर्ण कहाणी मांडण्यात आली आहे.

Advertisement

अशाचप्रकारे 1998मधील प्रसिद्ध चिनी ड्रामा ‘माय फेयर प्रिंसेस’मध्ये देखील एका श्रीमंत परिवाराच्या मुलीचा असा प्रसंग दाखविण्यात आला आहे. कहाणीत तिचे पिता या विवाहाला विरोध करतात, कारण मुलगीने फेकलेला चेंडू एका गरीब युवकाच्या हाती लागतो. अशा  कहाण्या चित्रपट, सीरियल्स आणि साहित्यात दर्शविण्यात आल्या आहेत.

प्रेम व्यक्त करण्याची पद्धत

गुआंग्शीमधील झ्आंग स्वायत्त क्षेत्रात राहणाऱ्या झुआंग समुदायात कढाईयुक्त चेंडू फेकण्याची परंपरा अत्यंत लोकप्रिय राहिली आहे. झुआंग समुदाय गुआंग्शीच्या लोकसंख्येचा 30 टक्क्यांहून अधिक हिस्सा राखून आहे. येथील युवक आणि युवती पारंपरिक पद्धतीने या चेंडूंचा वापर करत परस्परांबद्दल प्रेम व्यक्त करत होते. खासकरून तिसऱ्या चंद्र महिन्याच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या एका पारंपरिक महोत्सवात युवा मोठ्या संख्येत एकत्र यायचे. येथे गाण्यांदरम्यान युवक-युवती स्वत:च्या प्रेमाला व्यक्त करत होते. जर दोन जण परस्परांना पसंत करत असतील तर कढाईयुक्त चेंडू फेकायचे, अनेकदा चेंडूसोबत एक छोटेसे गिफ्टही बांधले जायचे.

खास चेंडू

हा चेंडू काही साधारण नसायचा, सर्वसाधारणपणे तो मूठीत मावेल इतक्या आकाराचा असतो आणि तो हाताने तयार केला जातो. याला सुमारे 12 कपड्यांनी भरलेल्या हिस्स्यांना जोडून तयार केले जाते. चेंडूवर चमकणाऱ्या अन् शुभ मानण्यात येणाऱ्या रंगांचे नक्षीकाम केले जाते. यात रंगबिरंगी रिबन लटकविले जातात. चेंडूच्या अनेक हिस्स्यांमध्ये अनेकदा बियाणी अन् भाताचा भूसा भरला जातो, त्यावर फुलं, पक्षी आणि इतर डिझाइन्स तयार केली जातात. चेंडू जितका सुंदर अन् बारकाईने तयार केला जातो, तितकाच तो युवकाचे लक्ष वेधून घेत होता.

पती निवडण्याची कहाणी

मूळ परंपरेत युवक-युवती परस्परांच्या दिशेने चेंडू फेकायचे, तर चित्रपट अन् कहाण्यांमध्ये बाल्कन्यांमधून चेंडू फेकून पती निवडण्याची कहाणी मांडण्यात आली. साहित्य अन् चित्रपटांनी या लोकपरंपरेला एक नाट्यामय वळण दिले. जुन्या चीनमध्ये विवाह केवळ दोन लोकांचा वैयक्तिक निर्णय नसायचा. खासकरून राजघराणहंच्या काळात विवाहाला परिवारांदरम्यान आघाडी मानले जात होते. परिवाराची प्रतिष्ठा, सामाजिक योग्यता आणि आर्थिक स्थिती यासारख्या गोष्टी विवाहाच्या निर्णयात महत्त्वपूर्ण ठरायचे. महिलांना स्वत:चा साथीदार निवडण्याचे स्वातंत्र्य देखील मर्यादित होते. अशा वातावरणात चेंडू फेकून साथीदार निवडण्याची कहाणी एकप्रकारे पारंपरिक विवाहाच्या व्यवस्थेच्या विरोधात स्वत:ची पसंत व्यक्त करण्याची प्रतीक ठरली. चेंडू ज्या व्यक्तीकडे जाणार, त्याच्यासोबत विवाहाचा निर्णय घेणे प्रेम अन् नशीब सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा किती महत्त्वपूर्ण असते हे यातून दाखविण्याचा प्रयत्न असावा. अनेक लोकांसाठी ही पंरपरा आज प्रेम, पसंत अन् स्वत:च्या जीवनाचा निर्णय स्वत: घेण्याची भावना दर्शविते.

Advertisement
Tags :

.