महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विवाहाच्या १८ व्या वर्षांनी पती झाला पत्नी

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनोखी प्रेमकहाणी व्हायरल

Advertisement

प्रेमात पडलेले लोक परस्परांच्या छोट्या गोष्टींचीही काळजी घेतात. तसेच जोडीदाराच्या आनंदासाठी अनेकदा लोक मोठे निर्णयही अत्यंत सहजपणे घेत असतात. सध्या एक अशीच प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोघांचा विवाह एका सामान्य जोडप्याप्रमाणे झाला होता, ज्यात वधू आणि वर होता. विवाहानंतर त्यांना 3 अपत्यंही झाली, परंतु विवाहाच्या 18 व्या अॅनिव्हर्सरीनंतर सर्वकाही बदलून गेले. ही कहाणी अमेरिकेच्या ऊटा येथे राहणाऱ्या शाय स्कॉट आणि अमांडा यांची आहे. शाय वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच स्वत:च्या ओळखीबद्दल आनंदी नव्हते, परंतु मोठे होईपर्यंत त्यांना काहीच समजू शकले नाही. अखेर तऊणावस्थेत त्याने अमांडासोबत विवाह केला, शाय आणि अमांडा यांचा विवाह 2006 साली झाला होता. 2012 मध्ये दांपत्याला एक मुलगी झाली, याच्या 2 वर्षांनी मुलगा झाला आणि मग 2018 मध्ये तिसऱ्या अपत्याने जन्म घेतला.

Advertisement

परंतु यानंतर देखील शाय यांना स्वत:च्या जीवनात काहीतरी कमतरता भासत होती, अखेर त्याने स्वत:च्या पत्नीसमोर मन मोकळं करत महिला होणे आवडत असल्याचे सांगितले. पत्नीने काहीसा वेळ घेत त्याचे मन जाणून घेतले, अमांडा शायवर प्रचंड प्रेम करत असल्याने तिने त्याला गमावण्याऐवजी त्याचा जसा आहे तसा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या संमतीनंतर शायने स्वत:चे लिंगपरिवर्तन करत पतीहून पत्नी होण्याचा मार्ग निवडला. मी अमांडासोबत बोलण्यास घाबरत होतो, परंतु मला वाचनामुळे आत्मविश्वास मिळाला. अमांडाने माझ्या आनंदासाठी माझी ट्रान्सजेंडर ओळख स्वीकारली आणि मलाही ती स्वीकारण्यास मदत केली. तसेच तिच्यासोबतच मे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतली असे शायने सागितले. एप्रिल 2023 मध्ये त्याचा चेहरा आणि शरीराची पूर्ण शस्त्रक्रिया करवत महिलेचे रुप मिळवून देण्यात आले. परिवार अद्याप एकत्र आहे. यात दोन्ही पत्नी आणि तीन मुले आहेत. शाय आणि अमांडाच्या इन्स्टाग्रामवर सांगण्यात आलेल्या या कहाणीवर लोकांच्या कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक जण मुलांसोबत चुकीचे घडले असे म्हणत आहेत, मुलांनी स्वत:च्या पित्याला गमाविल्याची कॉमेंट त्यांच्याकडून केली जात आहे. तर अनेक जणांनी जोडपे आणि परिवाराचे कौतुक केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article