महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नांदायला येत नसल्याने पतीचा पत्नी-सासूवर चाकू हल्ला

11:29 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बैलहोंगल तालुक्यातील यरडाल येथील घटना

Advertisement

बेळगाव : तिगडी (ता. बैलहोंगल) येथील एका युवकाने माहेरी गेलेल्या पत्नी व सासूवर चाकू हल्ला केला आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर यरडाल, ता. बैलहोंगल येथे ही घटना घडली असून पत्नी सासरी आली नाही, या रागातून त्याने हल्ला केल्याचे समजते. अन्नपूर्णा विनोदगौडा पाटील (वय 59) रा. यरडाल, तिची मुलगी बसम्मा शिवानंद संगोळ्ळी (वय 30) रा. तिगडी अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसम्माचा पती शिवानंद संगोळ्ळी (वय 40) याने हे कृत्य केले आहे.

Advertisement

बसम्मा व शिवानंद या दाम्पत्याला एक मुलगा, एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणानंतर गेल्या दोन महिन्यांपूर्वी बसम्मा यरडाल येथील माहेरी आली आहे. याकाळात तिला बोलाविण्यासाठी शिवानंद दोनवेळा यरडालला आला. मात्र, ती त्याच्यासोबत गेली नाही. बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिवानंदने आपल्या सासरवाडीत घुसून सासू व पत्नीवर चाकू हल्ला केला आहे. त्याआधीच तो यरडालला पोहोचला होता. मात्र, तो घराबाहेर बसून होता. मध्यरात्री घरातील एक वृद्ध लघुशंकेसाठी उठला. दरवाजा उघडताच घरात शिरलेल्या शिवानंदने पत्नी व सासूवर चाकू हल्ला केला. सासू अन्नपूर्णाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यानंतर शिवानंद फरारी झाला असून बैलहोंगल पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article