For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक

06:33 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक
Advertisement

बैलहोंगल पोलिसांची कारवाई : घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याच्या रागातून कृत्य

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेल्या पत्नीचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या पतीला बैलहोंगल पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. चार दिवसांपूर्वी खुनाचा हा प्रकार घडला होता.

Advertisement

राजू लक्ष्मण माडमगेरी (वय 33, रा. इंदिरानगर, बैलहोंगल) असे त्याचे नाव आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी राजूने आरवळ्ळी-नयानगरजवळ आपली पत्नी लक्ष्मी माडमगेरी (वय 31, रा. इंदिरानगर, बैलहोंगल) हिचा आमटूरजवळ ओढणीने गळा आवळून व दगडाने ठेचून खून केला होता. राजू व लक्ष्मी यांचा प्रेमविवाह झाला आहे. कौटुंबिक कारणामुळे लक्ष्मीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

दि. 27 सप्टेंबर रोजी केसांना टाचण्या, पिना विकण्यासाठी म्हणून लक्ष्मी आरवळ्ळी-नयानगरला गेली होती. त्याच दिवशी दुपारी 12.45 ते सायंकाळी 7.30 या वेळेत लक्ष्मीला गाठलेल्या राजूने तिचा खून केला आहे. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद यलिगार, उपनिरीक्षक डब्ल्यू. एच. यादवाड यांनी राजूला अटक केली आहे.

Advertisement
Tags :

.