For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | एसटी-दुचाकी समोरासमोर धडकेत पती-पत्नी ठार; मुलगी जखमी

12:05 PM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur news   एसटी दुचाकी समोरासमोर धडकेत पती पत्नी ठार  मुलगी जखमी
Advertisement

एसटीची आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक

Advertisement

कुर्डुवाडी : कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावरील चिंचगाव (ता. माढा) शिवारात एसटी बस आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची ७ वर्षांची मुलगी बचावली असून, ती जखमी झाली आहे. हा अपघात सोमवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास माईलस्टोन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ घडला.

सागर रंभा काळे (वय ३६), नेहा सागर काळे (वय २४, रा. नेरले, ता. करमाळा) अशी अपघातात जागीच मृत पती-पत्नीची नावे आहेत. दुर्वा सागर काळे (वय ७) ही मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Advertisement

रोपळे क. येथे शिक्षक असलेले सागर काळे पत्नी नेहा आणि मुलगी दुर्वा यांच्यासह मोटारसायकलवरून (एमएच ४५ एडब्ल्यू १२८९) नेरले येथून कुडुवाडीमार्गे म्हैसगाव (ता. माढा) कडे निघाले होते.

दरम्यान, बार्शीहून स्वारगेटच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या एसटीने ( एमएच १४ बीटी ४६५२) चिंचगाव हद्दीत काळे यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. धडक बसताच सागर काळे, पत्नी जखमी होऊन जागीच मृत पावले. ७ वर्षांची दुर्वा मातीवर पडली. त्यामुळे धोका टळला. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी प्रवीण काळे यांनी कुडुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून एसटी बस चालक धीरज गोरबा शिवारे (बार्शी आगार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वामीनाथ लोंढे तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.