आष्ट्यात पती-पत्नीस मारहाण
आष्टा :
आष्ट्यात पती-पत्नीस मारहाण वार्ताहर आष्टा आष्टा येथे जमिनीच्या वादातून पती-पत्नीस दोघांनी मारहाण केली. लोखंडी खोरे व दगडाच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. या घटनेत पती-पत्नी किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी दोघांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
मानसिंग पंडितराव काटकर (वय ४९), गीता मानसिंग काटकर दोघे राहणार कदम वेस आष्टा अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे असून पोलिसांनी संशयित केदार भिमराव काटकर, प्रियांका केदार काटकर दोघे राहणार कदम वेस आष्टा यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी मानसिंग काटकर यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील फिर्यादी व आरोपी यांचेत सामाईक क्षेत्र गट नं ७१७मध्ये वाद चालु असुन संशयित आरोपी यांने दि ०१.०.२०२४ रोजी १४.०० वा.चे सुमारास फिर्यादीच्या घरकुलाचे बांधकाम चालु असले ठिकाणी काढलेला खड्डा यातील आरोपीत केदार भिमराव काटकर व प्रियांका केदार काटकर हे दोघे मुजवत असताना फिर्यादी यांनी त्यांना खड्डा मुजवू नका असे म्हणले असता त्याचा राग मनात धरून आरोपी केदार भिमराव काटकरने लोखंडी खो-याने फिर्यादीच्या डोक्यात डाव्या पुढील बाजुस मारले व त्याला रस्त्यावर ओढत नेऊन रस्त्यावर असलेला दगड घेवुन उजव्या हातावर व उजव्या छातीवर मारुन फिर्यादीस जखमी केले.
तसेच फिर्यादीची पत्नी गिता हिला प्रियांका हिने सिमेटच्या डांबावर ढकलुन देवुन खड्डयात पाडले व तिला किरकोळ जखमी केले व त्या दोषांना शिवीगाळ केली तसेच फिर्यादीचा मुलगा प्रणव यांस केदार काटकर यांनी तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. या घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.