For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुखावलेल्या हिंदूंनी मतदानातून काढला वचपा

02:49 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुखावलेल्या हिंदूंनी मतदानातून काढला वचपा
Advertisement

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची प्रतिक्रिया

Advertisement

पणजी : पंधरा वर्षे सातत्याने सत्तेवर राहिल्याने जनतेमध्ये थोडीफार सरकारच्या विरोधात भावना निर्माण होते आणि त्यातच हिंदू जनतेवर जे आघात केले, हिंदुंचा जो छळ केला, त्यामुळे दुखावलेल्या हिंदू मतदारानी आपली नाराजी मतपत्रिकेतून व्यक्त करून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांना दूर केले, अशी प्रतिक्रिया वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने जो प्रचंड बहुमताने विजय प्राप्त केला त्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करतो. या दोन नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ज्या पद्धतीने प्रचार केला आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण केला. शिवाय जनतेमध्ये विकासकाम करण्याची क्षमता दाखवून दिली. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले. बंगालमधील भाजपचा झालेला विजय हा इतर पक्षांसाठी जनतेने दिलेला चांगला धडा आहे. आपण भाजपच्या नेत्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.