For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

VIDEO>>आमच्या उसातनं तुम्ही घ्या बोनस...आम्ही बसतो रिकामं...! शेतकऱ्यांचा प्रश्नाने कारखान्याचा अधिकारी गप्पगार!

03:57 PM Nov 03, 2023 IST | Abhijeet Khandekar
video  आमच्या उसातनं तुम्ही घ्या बोनस   आम्ही बसतो रिकामं     शेतकऱ्यांचा प्रश्नाने कारखान्याचा अधिकारी गप्पगार
swabhimani shetkari sanghatana
Advertisement

अभिजीत खांडेकर / तरूण भारत

Advertisement

सणवार जवळ आलाय...घरात बाजार भरायला....मुलांच्या कपडे खरेदीला पैसे नाहीत...अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. त्यात तुम्ही ऊसदर जाहीर न करता ऊस कसा काय नेताय...असा प्रश्न विचारून शेतकऱ्यांनी हुपरी येथील जवाहर- आवाडे साखर कारखान्याच्या प्रशासनाला धारेवर धरले. शेतकऱ्यांनी एवढ्य़ावरच न थांबता आमच्या उसातनं तुम्ही बोनस घ्या....आणि आम्ही रिकामचं बसतो असे म्हणून शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला आरसा दाखवला. या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने ऊसप्रश्न येत्या काही दिवसात वेगळ्या वळणावर असल्याचे जाणवते.

पहा VIDEO>>> तुम्ही घ्या बोनस...आम्ही बसतो रिकामं!

Advertisement

महाराष्ट्रातील ऊस हंगाम गेल्या 1 तारखेपासून चालु राहतील असा शासनाने जाहीर केले. मात्र मागील हंगामातील 400 रूपय़े आणि चालू गाळप हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान 3500 रूपये विनाकपात पहिला हप्ता देण्याची मागणी सर्वच शेतकरी संघटनांनी केली आहे. ही मागणी मान्य नाही झाली तर कारखाने सुरु करताना कारखानदारांना मोठा संघर्ष करावा लागेल असे आव्हान दिले आहे. त्यामुळे गळित हंगाम सुरु झाला तरी संघर्षाच्या भीतीने राज्य़ातील बहूतेक कारखाने बंदच आहेत.

काल शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींमद्ये झालेल्या बैठकीमध्ये तोडगा निघेल असे वाटत होते पण बोलणी फिस्कटल्याने उस गळीत हंगाम लाबण्य़ाची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असलेले काही कारखाने महाराष्ट्राबाहेरील किंवा आसपासचा ऊस आणून कारखाना चालु करण्याच्या प्रयत्नात असताना शेतकऱ्यांनी उसवाहतूक अडवल्याचे प्रकार घडत आहेत.

जिल्ह्यातील अनेक कारखान्यांसह हुपरी येथिल जवाहर सहकारी साखर कारखान्यानेही अजून दर जाहीर केलेला नाही. तरीही उसाची तोडणी चालु करून वाहतुक केला जात आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी हि उसवाहतूक अडवून ऊसदर जाहीर न करता कारखाना प्रशासनाने कारखाना सुरू कसा काय केला..? असा प्रश्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी काही बोलक्या प्रतिक्रिया देऊन कारखान प्रशासनाला आरसा दाखवला. "आमच्या ऊसातनं तुम्ही बोनस घ्या....आम्ही रिकामाच बसतो. शेतकऱ्याच्या घरात बाजार भरायला पैसे नाहीत....मुलांना कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत...अशी शेतकऱ्यांची परिस्थिती असताना कारखान्याने अजून दर जाहीर केलला नाही. दर जाहीर न करताच कारखाना ऊस वाहतूक कशी काय करतोय...कारखाना प्रशासनाला शेतकऱ्याच्या ऊसामुळे दिवाळीला बोनस मिऴतोय...पण शेतकरी रिकामंच बसला आहे." अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून पहायला मिळाल्या. शेतकऱ्यांच्या या चपराकीमुळे कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

Advertisement
Tags :

.