‘हंटर 2’ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूडचे दोन दमदार कलाकार सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ आता एका वेबसीरिजमध्ये परस्परांशी भिडताना दिसून येणार आहेत. ‘हंटर 2’ सीरिजमध्ये दोघांमध्ये शत्रुत्व दिसून येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर सादर करण्यात आला असून यात भरपूर अॅक्शन दिसून येत आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी विक्रमच्या अवतभवती घुटमळणारी याची कहाणी आहे, त्याची मुलगी पूजाचे ‘द सेल्समन’ गुन्हेगार अपहरण करतात असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. एकीकडे सुनील स्वत:च्या जुन्या व्यक्तिरेखेत पुन्हा दिसून येत आहे. तर दुसरीकडे या सीझनमध्ये जॅकी श्रॉफ ‘द सेल्समन’च्या भूमिकेद्वारे खलनायक झाला आहे. त्यानेच अधिकाऱ्याच्या मुलीचे अपहरण केले असते.
या सीरिजमध्ये अनुषा दांडेकर, बरखा बिष्ट, अनंग देसाई, प्रमोद पाठक आणि मेजल व्यास यासारखे कलाकार आहेत. ‘हंटर 2’ ही सीरिज अमेझॉन एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम करण्यात आली असून प्रेक्षकांचा प्रतिसादही याला मिळत आहे.