उड्डाणपुलावरील खड्डयांसाठी उद्यापासून उपोषण
रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचा कानाडोळा : नागरिकांचा जीव धोक्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील खड्डा सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्यापही भरलेले नाहीत. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील उ•ाणपुलावरील ख•dयांची दुरुस्ती होत नसल्याने गुरुवार दि. 21 ऑगस्टपासून नागरिकांकडून उपोषण केले जाणार आहे.
बेळगाव शहर व उद्यमबागला जोडणाऱ्या तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावर मे महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसाने खड्डा पडले. सध्या अनगोळ येथील रेल्वेगेटचे काम सुरू असल्यामुळे सर्व वाहतूक तिसरे रेल्वेगेट मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे उ•ाणपुलावर प्रचंड वर्दळ वाढली आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील कामगार बाहेर पडल्यानंतर उड्डाणपुलावर प्रचंड गर्दी होत असून वाहतूक कोंडी होत आहे.
उड्डाणपुलावर ठिकठिकाणी तब्बल फूटभर खोल खड्डा पडले आहेत. अनेकवेळा जिल्हा प्रशासन, तसेच महानगरपालिकेला कळवूनदेखील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. महिन्याभरापूर्वी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन खड्डा बुजविण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली होती. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने त्यापूर्वी दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती.
मागील चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्डयांची संख्या अधिकच वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीसाठी पावसात हॉटमिक्स उपयोगी होणार नाहीत, असे कारण दिले. परंतु बदलत्या तंत्रज्ञानानुसार कोल्डमिक्सचा वापर करून वेळेत ख•s भरणे गरजेचे आहे. अन्यथा एखाद्या निष्पापाचा बळी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अखेर उपोषणाचे अस्त्र उगारण्यात आले आहे. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर व त्यांचे सहकारी ख•dयांसाठी उपोषण करणार आहेत.