अमेरिकेत शेकडो परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द
देश सोडण्याचे परराष्ट्र विभागाचे आदेश
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या शेकडो परदेशी विद्यार्थ्यांना अचानक त्यांचा इ-1 व्हिसा म्हणजेच विद्यार्थी व्हिसा रद्द करण्याबाबतचा ई-मेल आला आहे. सदर विद्यार्थ्यांना अमेरिका सोडण्यास सांगण्यात आले आहे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे. अमेरिकन सरकार ‘कॅच अँड रिव्होक’ अॅपच्या मदतीने अशा विद्यार्थ्यांची ओळख पटवत आहे.
अमेरिकन परराष्ट्र विभागाने हा मेल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाठवला आहे. हे ई-मेल कॅम्पस अॅक्टिव्हिटीमध्ये म्हणजेच कॅम्पसमध्ये होणाऱ्या निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियावर ‘इस्रायलविरोधी’ पोस्ट शेअर, लाईक किंवा कमेंट करणाऱ्यांचाही यामध्ये समावेश असल्याचे समजते. परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या मते, 26 मार्चपर्यंत, 300 हून अधिक ‘हमास-समर्थक’ विद्यार्थ्यांचे इ-1 व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.