For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : साताऱ्यात शेकडो नागरिकांनी अजितदादांचे दर्शन घेऊन श्रद्धांजली केली अर्पण

05:48 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   साताऱ्यात शेकडो नागरिकांनी अजितदादांचे दर्शन घेऊन श्रद्धांजली केली अर्पण
Advertisement

                         अजितदादा पवार यांचे अस्थि दर्शन राष्‍ट्रवादी कार्यालयात

Advertisement

सातारा : सातारा जिल्‍ह्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या अजितदादा पवार यांच्‍या अस्‍थि मंगळवारी साताऱ्यात दाखल झाल्‍या. पोवईनाका येथील दूध संघाशेजारील राष्‍ट्रवादी कार्यालयात शेकडो कार्यकर्‍त्यांनी दादांच्‍या या अस्‍थिंचे दर्शन घेतले. दादांचा हा अस्‍थिकलश पाहून सातारकरांचे डोळे पाणावले. दुपारनंतर या अस्‍थि संगममाहुली येथे कृष्‍णा-वेण्‍णा नदीच्‍या संगमामध्‍ये विसर्जित करण्‍यात आल्‍या.

राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजितदादा पवार यांचे दि. २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या घटनेने महाराष्‍ट्रावर शोककळा पसरली. सातारा जिल्‍ह्यातील नागरिक या घटनेने धायमोकलून रडले. दादांच्‍या अचानक जाण्‍याने सर्वजण स्‍तब्‍ध झाले होते. अजूनही या दु:खातून सावरणे अजितदादांवर प्रेम करणाऱ्या लोकांना शक्‍य झालेले नाही. अपघाताच्‍या दुसऱ्या दिवशी बारामती येथील विद्या प्रतिष्‍ठानच्‍या आवारामध्‍ये अजितदादांवर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले होते. दादांना अखेरचा निरोप देण्‍यासाठी हजारो सातारकर बारामतीला गेले होते. मात्र, अनेकांना बारामतीला जाता आले नव्‍हते, या लोकांच्‍या भावनांचा विचार करुन राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादांचा अस्‍थिकलश सातारा येथे आणण्‍यात आला. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ३.३० यावेळेत हा अस्‍थिकलश दर्शनासाठी कार्यालयात ठेवण्‍यात आला होता.

Advertisement

जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष खा. नितीन पाटील, नगराध्‍यक्ष अमोल मोहिते, राजकुमार पाटील, प्रकाश येवले, सौरभ शिंदे, संदीप चव्‍हाण, मेघा नलावडे, गोरखनाथ नलावडे, लक्ष्‍मीताई कळंबे,
ष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष बाळासाहेब सोळस्‍कर, श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्‍टचे संस्‍थापक राजेंद्र चोरगे, जिल्‍हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, राजेंद्र लवंगारे, निशा डाळवाले, गोयेगिता सकुंडे, सुप्रिया बगाडे, सुप्रिया देशमुख, प्रविण निकम, संग्राम लवंगारे, शितल कदम, सीमा जाधव, स्‍मिता देशमुख, अमित कदम, चंद्रकांत सणस, आशाताई कदम, संजय पाटील, आदींसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी तसेच सामान्‍य नागरिकांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या कार्यालयात येवून या अस्‍थिकलशाचे दर्शन घेतले. तसेच अजितदादांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण केले.

Advertisement
Tags :

.