For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

हुमरस वारंगवाडीत ग्रामस्थांच्या एकजुटीतून मातीचा बंधारा; जलसंवर्धनासाठी पुढाकार

02:41 PM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
हुमरस वारंगवाडीत ग्रामस्थांच्या एकजुटीतून मातीचा बंधारा  जलसंवर्धनासाठी पुढाकार
Advertisement
प्रतिनिधी / झाराप : कुडाळ तालुक्यातील हुमरस वारंगवाडी येथे ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि आर्थिक सहकार्याच्या जोरावर जलसंवर्धनासाठी मोठा मातीचा बंधारा उभारण्यात आला आहे. गावातील मोठ्या ओहोळावरील पुलाचा नियोजनपूर्वक वापर करून उभारण्यात आलेला हा बंधारा परिसरात औत्सुक्याचा विषय ठरत आहे.

संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन गावातील वाहते पाणी अडविण्यासाठी ग्रामस्थांची गावच्या देवळात सभा घेण्यात आली. या सभेत उपलब्ध जागेचा योग्य वापर करून जलसंधारणाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी मुंबईस्थित ग्रामस्थांनी आर्थिक सहकार्य केले, तर स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानासह आर्थिक हातभार लावला.

Advertisement

बंधारा उभारण्यासाठी मोठ्या प्लायवूडचा, प्लास्टिक कापडाचा आणि सुमारे 15 डंपर मातीचा वापर करण्यात आला. ग्रामस्थ, शेतकरी, तरुण आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत या कामासाठी मेहनत घेतली.

या उपक्रमासाठी सरपंच प्रवीण वारंग, माजी सरपंच तथा ज्येष्ठ कार्यकर्ते सहदेव ऊर्फ दाजी वारंग यांनी विशेष पुढाकार घेतला. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठाननेही या कामासाठी सहकार्य केले. ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेल्या या उपक्रमामुळे जलसंवर्धनाच्या कामाला चालना मिळाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.