For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माणसांना असतो तिसरा डोळा

06:28 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
माणसांना असतो तिसरा डोळा
Advertisement

वैज्ञानिकांनी अलिकडेच एक चकित करणारा शोध लावला आहे. आम्हा सर्वांकडे तिसरा डोळा आहे, परंतु आता तो अवशेष आहे. आता त्याचे काम पाहणे नव्हे तर झोप अन् शरीराच्या घड्याळाला नियंत्रित करणे आहे. आमच्या डोक्याच्या मधोमध लपलेला पिनियल ग्लँड प्रत्यक्षात प्राचीन ‘तिसऱ्या डोळ्या’चा अवशेष आहे.

Advertisement

करंट बायोलॉजी नियतकालिकात प्रकाशित एका संशोधनपत्रानुसार युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स आणि लुंड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी लाखो वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांना एक मध्ययुक्त डोळा होता, जो काळासोबत उत्क्रांत होत पिनियल ग्लँड झाला असल्याचा दावा केला आहे. हा शोध आमचे डोळे आणि शरीराच्या घड्याळाच्या विकासाची नवी कहाणी सांगणारा आहे.

जवळपास 50 कोटी वर्षांपूर्वी आमचे पूर्वज सागरी जीव होते, जे समुद्राच्या खोलवर गाळ आणि अंधारात राहत होते. या जीवांचे दोन्ही बाजूचे डोळे हळूहळू काम करणे बंद केले, कारण ते अंधारात निरुपयोगी ठरले होते. परंतु त्यांच्या डोक्याच्या मधोमध एक खास संरचना होती, ज्याला संशोधकांनी ‘कॉम्पोजिट एंसेस्ट्रल मीडियन आय’ नाव दिले आहे. हा मध्ययुक्त डोळा प्रकाशाचा शोध घेणे, दिवसरात्रीची ओळख पटविणे आणि दिशाज्ञान राखण्यास मदत करत होता.

Advertisement

जेव्हा हे जीव भुयारांमध्ये राहू लागले, तेव्हा त्यांनी बाजूचे डोळे गमाविले, परंतु मीडियन आय कायम ठेवला, कारण हा त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक होता. संशोधक प्राध्यापक टॉम बेडेन यांच्यानुसार कालौघात या मध्य डोळ्याचे काही हिस्से दोन बाजूला गेले, आमची आजची रेटिना निर्माण झाली, तर मधला हिस्सा पिनियल ग्लँडच्या स्वरुपात तयार झाला.

पिनियल ग्लँडचे कार्यस्वरुप

पिनियल ग्लँड आमच्या मेंदूच्या मध्ये स्थित एक छोटासा अवयव आहे. हा आता प्रकाशाला थेट पाहू शकत नाही, परंतु आमच्या दोन्ही डोळ्यांनी प्रकाश आणि अंधाराची माहिती प्राप्त करतो. याची सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार करणे आहे. जेव्हा रात्र असते, तेव्हा पिनियल ग्लँड मेलाटोनिन सोडते, जे शरीराला आता झोपण्याची वेळ असल्याचे सांगते,  यामळे आमची सर्कैडियम रिदम म्हणजेच 24 तासांचे शारीरिक घड्याळ नियंत्रित होते. हे केवळ झोप नव्हे तर प्रजनन प्रणली, इम्यून सिस्टीम, मूड आणि शरीराच्या तापमानालाही प्रभावित करते. दिवसा हे हार्मोन कमी तयार होते, जेणेकरून आम्ही जागे राहू शवपे.

रेटिना पूर्वी होते डोळे

रेटिना डोळ्यांपूर्वी विकसित झाल्याचे संशोधकांचे सांगणे आहे. खोल पाणी किंवा गाळात दिवसरात्रीची ओळख पटविणे आणि वर-खालील दिशा जाणणे अत्यंत आवश्यक हेते, बाजूचे डोळे अस्तित्वहीन झाले, परंतु मीडियन आय कायम राहिले, कारण ते याच कामासाठी निर्माण झाले होते असे प्राध्यापक बेडेन यांचे सांगणे आहे. या अध्ययनात नवे प्रयोग करण्यात आलेले नाहीत. संशोधकांनी मासे, लँप्री (एक प्राचीन मासा) आणि अन्य जीवांचे आनुवांशिक डाटा, जीवाश्म आणि वर्तमान अध्ययनांचे विश्लेषण केले, यातून आमचे डोळे आणि पिनियल ग्लँड वेगवेगळे निर्माण झाले नाहीत, तर एकाच प्राचीन संरचनेतून विकसित झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

अध्यात्मिक मान्यता

पिनियल ग्लँडला प्राचीन काळापासून अत्यंत महत्त्व दिले जात आहे. युनानी चिकित्सक याला हजारो वर्षांपूर्वी ओळखत होते. हिंदू आणि योग परंपरेला याला आज्ञाचक्र किंवा तिसरे नेत्र म्हटले जाते. योग आणि ध्यानाच्या परंपरेत याल जागृत केल्याने अंतर्दृष्टी, अंतर्ज्ञान, क्लेयरवॉयन्स आणि अध्यात्मिक ज्ञान मिळत असल्याचे सांगण्यात येते. परंतु विज्ञान आतापर्यंत या अध्यात्मिक शक्तींना सिद्ध करू शकलेले नाही. वैज्ञानिकांनुसार हा अवयव मुख्य स्वरुपात जैविक कार्ये खासकरून झोप आणि हार्मोन नियंत्रणासाठी आहे. तर हा शोध विकास नेहमीच सरळ नसतो, काही जुन्या संरचना पूर्णपणे नष्ट होत नाही, तर नव्या रुपात आमच्या शरीरात कायम राहतात हे सांगतो. पिनियल ग्लँड याचाच पुरावा आहे. यामुळे झोपेचे आजार, नैराश्य आणि हार्मोनसंबंधी समस्या समजून घेण्यास मदत मिळू शकते.

आजही काही जीवांमध्ये तिसरा डोळा

काही जीवांमध्ये हा तिसरा आजही स्पष्टपणे दिसून येतो. न्यूझीलंडचा टुआतारा नावाचा सरीसपृ याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याच्या डोक्यावर एक छोटासा डोळा असतो, ज्यात लेन्स अन् रेटिना देखील आहे. हा विस्ताराने पाहू शकत नाही, परंतु वरून येणाऱ्या प्रकाशात बदलाचा शोध लावू शकतो. यामुळे टुआताराला दिवस-रात्रीबद्दल कळते. तो उन्हात बसणे किंवा लपण्याचा निर्णय घेत असतो.

Advertisement
Tags :

.