For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाझापट्टीतील पॅलेस्टिनींसाठी भारताकडून मानवतावादी मदत सुरूच

06:39 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
गाझापट्टीतील पॅलेस्टिनींसाठी भारताकडून मानवतावादी मदत सुरूच
Advertisement

32 टन जीवनावश्यक वस्तू रवाना : गाझापट्टीत हमासविरोधी मोहीम सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, गाझा

इस्रायल-हमास युद्धादरम्यान पॅलेस्टिनींना मानवतावादी मदतीसाठी भारताने सी-17 विमानांद्वारे इजिप्तमध्ये 32 टन आवश्यक वस्तू पाठवल्या आहेत. ही मदत इजिप्तमार्गे पॅलेस्टिनींपर्यंत पोहोचवली जाणार आहे. दुसरीकडे, अल-शिफा ऊग्णालयात अजूनही 25 कर्मचारी, 291 ऊग्ण आणि 32 नवजात मुले उपचार घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. गाझाचे अल-शिफा हॉस्पिटल डेथ झोन बनल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे.

Advertisement

इस्रायल, अमेरिका आणि हमास यांच्यात ओलिसांची सुटका करण्यासाठी लवकरच करार होणार आहे. अहवालानुसार, कतारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या करारानुसार ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात 5 दिवसांचा युद्धविराम होऊ शकतो. सध्या कोणताही करार झालेला नसल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले.

युद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय समुदायाकडून इस्रायलवर सातत्याने दबाव वाढवला जात आहे. गाझा आणि बाहेरील हमासचे लोक आमच्यासाठी जिवंत मृतदेह असल्याचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले. तर, आम्ही ग्राउंड ऑपरेशनच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत आणि लवकरच दक्षिण गाझामध्येही लष्कर हमासपर्यंत पोहोचेल. हमास आपले बोगदे, बंकर आणि तळ गमावत आहे. त्यांचे अनेक वरिष्ठ कमांडर आम्ही मारले आहेत. हमासला फक्त युद्धाची भाषा कळते. जीव वाचवणे हेच त्याचे आता एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही आमच्या ओलिसांचीही लवकरच सुटका करू, असे संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

ओलिसांच्या सुटकेसाठी भव्य रॅली

इस्रायलमध्येही पंतप्रधान नेतन्याहू यांच्याविरोधात भव्य रॅली काढण्यात आली आहे. तेल अवीव येथून सुरू झालेली ही रॅली शनिवारी रात्री उशिरा जेऊसलेममध्ये पोहोचली. यामध्ये सुमारे 30 हजार लोक सहभागी झाले होते. या सर्वांनी नेतन्याहू यांच्या कार्यालयाला घेराव घातला. सरकारने लवकरात लवकर हमासच्या कैदेतून ओलिसांची सुटका करावी, अशी या लोकांची मागणी आहे. ओलिसांना मुक्त करण्यासाठी सरकार काय करत आहे हे जाहीर करावे असे ओलिसांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.