माणसाचे पूर्वज होते नरभक्षक
माणसांचे पूर्वज स्वत:च्याच लोकांना खात होते का? एखाद्या भयपटातील कहाणीप्रमाणे हा प्रश्न वाटू शकतो. परंतु स्पेनमध्ये झालेल्या एका नव्या पुरातात्विक शोधाने या प्रश्नाला पुन्हा चर्चेत आणले आहे. वैज्ञानिकांना सुमारे 8.5 लाख वर्षे जुन्या एका गुहेत असे मानवी अवशेष मिळाले आहेत, ज्यांच्यावर कापल्याचे आणि मांस वेगळे केल्याच्या स्पष्ट खुणा आहेत. त्या काळात माणसांचे पूर्वज स्वत:च्याच समुदायाच्या लोकांचे मांस खात होते याचा हा ठोस पुरावा असल्याचे संशोधकांचे मानणे आहे.
संबंधित शोध उत्तर स्पेनच्या बुर्गोस येथील ग्रान डोलीना गुहेत लागला आहे. येथे कॅटलन इन्स्टीट्यूट ऑफ ह्यूमन पेलियोइकोलॉजी अँड सोशल इवोल्युशनचे वैज्ञानिक अनेक वर्षांपासून उत्खनन करत राहिले आहेत.
मानवी हाडं अन् दात
उत्खननादरम्यान वैज्ञानिकांना हाडं अन् दांत मिळाले आहेत, यात कवटी, कणा, हात अन् पायाच्या हाडांचे तुकडे आणि तीन दात सामील आहेत. हे सर्व अवशेष होमो एंटेसेसर नावाच्या विलुप्त मानव प्रजातीचे असल्याचे सांगण्यात येत आहे, जो समारे 7.7 लाख ते 12 लाख वर्षांपूर्वी युरोपमध्ये राहत होता.
हाडांवर कापल्याच्या खुणा
वैज्ञानिकांनी या हाडांची तपासणी केली असता त्यावर दगडी अवजारांनी कापल्याचे आणि मांस वेगळे करण्याच्या स्पष्ट खुणा मिळाल्या आहेत. याचबरोबर पूर्वी याच गुहेतून मिळालेल्या मुलांच्या हाडांवरही अशाच खुणा आढळून आल्या होत्या. आता पहिल्यांदाच प्रौढ लोकांच्या हाडांवरही हाच पुरावा मिळाल्यावर संशोधकांचे त्यावेळी नरभक्षण केवळ मुलांपुरती मर्यादित नव्हते, तर प्रौढ लोकांनाही मारून खाल्ले जात होते असे मानणे आहे.
गुहेत 13-15 लोकांचे वास्तव्य
नव्या शोधातून त्यावेळी या गुहेत जवळपास 13-15 लोक राहत होते असेही कळले आहे. पूर्वी वैज्ञानिकांचा अनुमान याहून कमी लोकांचा होता. या शोधामुळे त्यावेळची मानवी संख्या, सामाजिक जीवन आणि राहणीमानाला पूर्वीपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत मिळणार आहे. ग्रान डोलीना गुहेत 1990 च्या दशकापासून सातत्याने उत्खनन होत आहे. येथे पहिल्यांदा होमो एंटेसेसरचे जीवाश्म मिळाले होते. 2025 मध्ये देखील याच गुहेतून एका मुलाच्या मानेचे हाड मिळाले होते, ज्यामुळे वैज्ञानिक चकित झाले होते. तो मुलगा केवळ 2-4 वर्षांचा होता. त्याची मान कापलेली होती आणि हाडांवर एखाद्या प्राण्याचे मांस कापले जाते, त्याप्रमाणे खुणा होत्या.
त्या मुलासोबत एखाद्या शिकार करण्यात आलेल्या प्राण्याप्रमाणे वर्तन करण्यात आले होते. मुलाला मारल्यावर त्याचे मांस खाल्ले गेले असावे असे संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या पुरातत्वतज्ञ पालमिरा सलाडी यांनी म्हटले हेते.
वैज्ञानिकांचा विचार बदलला
आतापर्यंत मुले आणि किशोरवयीनांचेच अवशेष मिळाले होते. याचमुळे नरभक्षण कोणत्या लोकांपर्यंत मर्यादित होते हे स्पष्ट नव्हते. परंतु आता प्रौढांच्या हाडांवर देखील कापण्याच्या खुणा मिळाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. हा शोध होमो एंटेसेसरची जीवनशैली, लोकसंख्या आणि सामाजिक वर्तनाला समजून घेण्यास एक मोठे वळण ठरेल असे सलाडी यांचे सांगणे आहे. आता आमच्याकडे या प्राचीन मानवसमुहाचे पूर्वीपेक्षा अधिक पूर्ण चित्र असल्याचे वक्तव्य संशोधक आंद्रेउ ओले यांनी म्हटले आहे.
केवळ मानवी हाडं नाहीत
गुहेतून मानवी हाडांसोबत दगडी अवजारंही मिळाली आहेत. ही अवजारं दगड, क्वार्ट्ज आणि बलुआ दगडाने निर्मित करण्यात आली होती. याचबरोबर काही प्राण्यांची हाडं देखील मिळाली आहेत. यामुळे वैज्ञानिकांना त्या काळातील पर्यावरण आणि माणसांच्या आहाराला समजून घेण्यास मदत मिळत आहे.
नरभक्षणाची बाब सिद्ध?
हा शोध होमो एंटेसेसर स्वत:च्याच समुदायाच्या लोकांचे मांस खात होते याचे मजबूत संकेत हा शोध देतो. परंतु हे भोजनाच्या अभावामुळे व्हायचे का एखाद्या हिंसक संघर्षामुळे किंवा हे त्यांच्या एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक परंपरेचा हिस्सा होते का हा संशोधनाचा विषय आहे. सध्या स्पेनमधील ही 8.5 लाख वर्षे जुनी गुहा मानवी इतिहासाच्या रहस्यांची उकल करण्यास मदत करत आहे.