‘टॉक्सिक’मध्ये हुमा कुरैशीची एंट्री
कियारा अन् यश मुख्य भूमिकेत
यशची मुख्य भूमिका असलेला ‘टॉक्सिक’ हा चित्रपट नव्या वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. निर्माते आता यातील प्रत्येक व्यक्तिरेखेसंबंधी माहिती उघड करत आहेत. यापूर्वी कियारा अडवाणीचा लुक समोर आला होता. आता चित्रपटात आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री झाली असून तिचा लुकही समोर आला आहे. ‘टॉक्सिक’मध्ये यशसोबत कियारा अडवाणीची जोडी जमणार असून आता आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. हुमा कुरैशी ही ‘टॉक्सिक’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील तिचा लुक जारी करण्यात आला असून यात ती किलर वाटतेय. ब्लॅक विंटेज कारसमोर ब्लॅक ड्रेसमध्ये उभी ‘टॉक्सिक’ची एलिझाबेथ उर्फ हुमा कुरैशीचा लुक पाहण्याजोगा आहे. 
टॉक्सिक फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्समध्ये एलिझाबेथ झालेल्या हुमा कुरैशीला एंट्रोड्यूस करत आहोत, असे यशने पोस्टला शेअर करत नमूद पेले आहे. यशचा हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचदिवशी आदित्य धरकडून दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. धुरंधर या चित्रपटाची क्रेझ पाहता ‘टॉक्सिक’च्या कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.