‘बेबी डू डाय डू’मध्ये हुमा कुरैशी
अत्यंत जबरदस्त भूमिकेत अभिनेत्री
आगामी अॅक्शन चित्रपट ‘बेबी डू डाय डू“च्या निर्मात्यांनी याचा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ जारी केला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिका ‘बेबी कर मर कर“ म्हणून अभिनेत्री हुमा कुरैशीला दाखविण्यात आले आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत अनेक हत्या होत असतात, या घटनांमागे एक रहस्यमय इसम जोडलेला आहे, पोलीस आणि माध्यम या घटनांमागील व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करतात. याचदरम्यान लाल छत्री घेऊन एक रहस्यमयी महिला फिरत असते असे अॅनिमेटेड व्हिडिओत दाखविण्यात आले आहे. या व्हिडिओत ‘माझी बहिणच हत्या करत आहे“ असे सांगताना दिसून येते.
हा चित्रपट 3 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सिकंदर खेर, चंकी पांडे, सीमा पाहवा, विद्या माळवदे, हिमांशु मलिक महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जसमीर के. रीन अन् परवेज शेखच्या कहाणीवर आधारित या चित्रपटाला गौरव शर्मा आणि दिग्दर्शक नचिकेत सामंत यांनी पटकथा दिली आहे. हा चित्रपट सलीम सिब्लिंग्सचे नवे प्रॉडक्शन असून ते हुमा कुरैशी अन् साकिब सलीमने सुरू केले होते. हुमा यापूर्वी ‘दिल्ली क्राइम“च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसून आली होती. तसेच ती आगामी काळात टॉक्सिक या बिगबजेट चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात यश, नयनतारा आणि कियारा अडवाणी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.