For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘खोसला को घोसला’च्या सीक्वेलमध्ये हुमा

10:57 AM Aug 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘खोसला को घोसला’च्या सीक्वेलमध्ये हुमा
Advertisement

2006 साली प्रदर्शित चित्रपट ‘खोसला का घोसला’ बॉक्स ऑफिसवर गाजला होता. दिवाकर बॅनर्जीच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटात अनुपम खेर, बोमन इराणी, विजय पाठक, रणवीर शौरी अणि प्रवीण डबास यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. डार्क कॉमेडीयुक्त या चित्रपटाचा आता सीक्वेल तयार केला जाणार आहे.  दिग्दर्शक उमेश बिष्ट आणि त्यांच्या टीमने याची पटकथा तयार केली आहे. या चित्रपटासाठी आता कलाकारांची निवड केली जात आहे. ‘खोसला का घोसला 2’मध्ये हुमा कुरैशी महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तिने पटकथा ऐकली असून तिची पसंतीही मिळाली असल्याचे समजते. या चित्रपटाचे चित्रिकरण नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित केला जाणार असल्याने निर्मात्यांकडे बराच कालावधी असणार आहे. हुमा याचबरोबर ‘टॉक्सिक’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास करत आहेत. या चित्रपटात यश, नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया आणि अक्षय ओबेरॉय असणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.