For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गणपतीपुळेच्या चौपाटीवर वाळूत अडकला प्रचंड व्हेल मासा! वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

12:28 PM Nov 13, 2023 IST | Abhijeet Khandekar
गणपतीपुळेच्या चौपाटीवर वाळूत अडकला प्रचंड व्हेल मासा  वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
huge whale stuck Ganpatipule chowpatty

रत्नागिरी किनारपट्टीवर गणपतीपुळे येथे व्हेल माशाचे पिल्लू समुद्राच्या भरतीच्या पाण्या बरोबर किनाऱ्यावर आले. दरम्यान ओहोटीच्या पाण्यामुळे ते वाळूत अडकल्याने त्याला परत पाण्यात जाता येईना त्यामुळे त्याला गणपतीपुळे येथील नागरीकांकडून जीवदान देण्यासाठी पाण्यात ढकलण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Advertisement

पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला स्थानिक आणि वन विभागाकडून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असून मत्स्य विभागच्या बोटीच्या साहाय्याने त्याला समुद्रात ओढत नेण्यात येणार आहे. ओहटीच्या पाण्यामुळे व्हेलं माशाच पिल्लू वाळूत अडकून पडल्याची बातमी समजताच किनाऱ्यावर स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
×

.