कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव दक्षिण मतदारसंघातून मृणाल हेब्बाळकरांना भरघोस पाठिंबा

01:03 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वडगाव आणि पिरनवाडी परिसरात महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी मतदारांकडूनही त्यांचे स्वागत करून औक्षण केले. तसेच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात आला. वडगाव येथील अनुसया सभागृहामध्ये प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना मतदारांनी साथ द्यावी. गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यामध्ये कार्यरत असून मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघाच्या विकासासाठी धोरण राबविण्यात आले असून त्यानुसार विकास साधला जाईल, असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी पिरनवाडी येथे मतदानासाठी प्रचारफेरी काढली. काँग्रेस सरकारकडून गोरगरिबांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून मतदारांनी अपेक्षेनुसार साथ देऊन मतदान केले आहे. त्याप्रमाणेच यावेळीही अत्याधिक मतदान करून मृणाल हेब्बाळकर यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, या भागातील मतदारांनी नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. मृणाल हेब्बाळकर यांच्या विजयासाठी संघटितपणे कार्य करून निवडून आणावे, असे आवाहन केले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष परशुराम ढगे, प्रदीप एम. जे., अमोल देसाई, महादेव गडकरी, साक्षी कणबरकर, माधुरी मिरजे, महेश पाटील, सचिन गोरले, पिराजी सुळगेकर, प्रमोद पाटील, विठ्ठल सांबरेकर, राजू कडोलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article