विशाल परबांनी तरुणांना वेगळी संधी उपलब्ध करून दिली
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार ; जॉब फेअरला उदंड प्रतिसाद
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. परंतु आज जिल्ह्यातील तरुण-तरुणी हे बाजूला असलेल्या गोवा राज्यात नोकरीसाठी स्थलांतर होत आहेत. हे कुठेतरी थांबणे गरजेचं होतं. त्यामुळे विशाल परब यांनी पुढाकार घेऊन सिंधूरत्न जॉब फेअरच्या माध्यमातून तरुणांना एक वेगळी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले.
यावेळी रवींद्र चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, मोठमोठ्या कंपनी आज आपल्या सावंतवाडीत आल्या आहेत. युवकांनी संधी साधून याचा लाभ घ्यावा, असे देखील आवाहन श्री.चव्हाण यांनी यावेळी केले आहे. दरम्यान तरुणांमध्ये जी शक्ती आहे. ती भविष्यात देशाला महाशक्तीकडे नेण्याची ताकद आहे. दरम्यान डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आज जग किती जवळ आले हे आपण पाहू शकतो. त्यामुळे युवकांनी या जॉब फेअर मध्ये जे नोकरी घेण्यासाठी येत आहेत. त्यांनी मी नोकरी करायला जाण्यापेक्षा मी नोकरी देणाराच का होऊ शकत नाही ? हा सुद्धा विचार करण्याची आजच्या काळात गरज आहे असे चव्हाण बोलताना म्हणाले.यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली,दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.