For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ही-मॅन’ ला मोठा प्रतिसाद

06:02 AM Jun 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ही मॅन’ ला मोठा प्रतिसाद
Advertisement

हॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सुपरहीरो चित्रपट ही-मॅन लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मास्टर ऑफ द युनिव्हर्सच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. ही-मॅन चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू आणि मल्याळी भाषेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हॉलिवूडच्या सुपरहीरो चित्रपटांना भारतीय प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. अशास्थितीत ही-मॅन हा चित्रपट भारतात मोठी कमाई करणार असल्याचे मानण्यात येत आहे. ही-मॅनच्या प्रदर्शनावेळीच अनेक बिगबजेट भारतीय चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांना ही-मॅनशी बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करावी लागणार आहे.

Advertisement

ही-मॅन सुपरहीरोजच्या जगतातील सर्वात लोकप्रिय पात्र आहे. हॉलिवूडमध्ये यापूर्वीही अनेकदा या पात्रावर चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत. अशास्थितीत आता 2026 मध्ये पुन्हा एकदा ही-मॅन परतणार आहे. यावेळी ही-मॅनच्या भूमिकेत हॉलिवूड सुपरस्टार निकोलेस गॅलिट्जिन दिसून येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.