हरियाणात प्रचंड दारुसाठा जप्त
06:24 AM May 18, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
यंदाच्या लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यापासून आजपर्यंत हरियाणा राज्यात 56 कोटी रुपयांचे मद्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यापैकी रोख रक्कम 11.50 कोटी रुपयांची आहे. याशिवाय विविध सरकारी प्राधिकारणांनी 3 लाख 83 हजार 38 लीटर बेकायदेशीर दारु जप्त केली आहे. या दारुची किंमत 12 कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती देण्यात आली. दारु आणि रोख रक्कम यांच्या शिवाय मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत 15 कोटी रुपयांहून अधिक आहे. या सर्व वस्तूंचा उपयोग मतदारांना आमीष दाखविण्यासाठी करण्यात येणार होता. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग आणि सरकारी सुरक्षा प्राधिकरणांनी निवडणुकीत अवैध धनाचा उपयोग केला जाऊ नये, यासाठी मोठी सज्जता केली असून देशभरातून 5 हजार कोटी रुपयांचे मद्य, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article