महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सणासुदीच्या काळात वाहन कंपन्यांकडून भरघोस सवलती

06:31 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मागील वर्षांपेक्षा अधिकची सवलत देण्यावर कंपन्यांचा भर

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

देशामध्ये सणासुदीचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. यामध्ये वाहन, दागिने आणि इतर वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते. या कारणास्तव, वाहन कंपन्या त्यांची विक्री वाढवण्यासाठी अनेक सवलती सादर करत आहेत. कार कंपन्यांना या सणाच्या हंगामात संपूर्ण वर्षाच्या विक्रीपैकी 25 टक्के विक्रीची अपेक्षा आहे.

कार कंपन्यांनी प्रथमच 10 लाखांहून अधिक वाहनांची विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या सणासुदीच्या हंगामात कंपन्यांनी 9.4 लाख वाहनांची विक्री केली होती. साधारणपणे, या हंगामात, उच्च श्रेणीतील वाहनांवर आणि कमी विक्री होणाऱ्या मॉडेल्सवर जास्त सवलत उपलब्ध होणार असल्याचे संकेत आहेत.

स्वस्त कार फक्त दिवाळीतच मिळते का? कार खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घेऊया याविषयी...

  1. सणासुदीच्या काळात कंपन्या किती सूट देतात?

कार कंपन्या विविध मॉडेल्सवर 25,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत. ही सवलत 2022 च्या सणासुदीच्या हंगामापेक्षा जास्त आहे.  2022 ते 2023 पर्यंत सवलतींमध्ये सरासरी 40-50 टक्के वाढ झाली आहे. काही मॉडेल्सवरील सूट 75 टक्के पर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे दुचाकी कंपन्याही सवलत देत आहेत.

सणासुदीच्या काळात कंपन्या सहसा 5 प्रकारच्या सूट देतात:

? विनिमय सवलत

? सण सवलत

? बँक सवलत योजना

? अॅक्सेसरीज सवलत

? वॉरंटी विस्तारित ऑफर

2. स्वत:साठी योग्य वाहन कसे निवडायचे?

सर्वप्रथम, तुम्हाला कोणत्या किंमतीला कार घ्यायची आहे याचे बजेट ठरवा. आता तुमच्या गरजेनुसार मॉडेल निवडा. जसे-रोजचे किती किलोमीटरचे अंतर कापता, निवासी क्षेत्र कसे आहे.

पेट्रोल वाहनाचे मायलेज आणि इलेक्ट्रिक वाहनाची श्रेणी हे वाहन खरेदीसाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. वाहनाची चाचणी राइड/ड्राइव्हदेखील घ्या, यामुळे तुम्हाला हे कळण्यास मदत होईल की वाहन चालवणे किती आरामदायक आणि शक्तिशाली आहे.

3. सणासुदीच्या काळात सर्वोत्तम डील कशी मिळवायची?

जेव्हा तुम्ही विव्रेत्याकडे जाल तेव्हा कार घेण्यास फार उत्सुक होऊ नका. अगदी सामान्य व्हा आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून चांगल्या सवलतीसह कार मिळवण्याचा प्रयत्न करा. अधिक स्वारस्य दाखविल्यास, विक्री करणारी व्यक्ती जास्त किंमत आकारण्याचा प्रयत्न करू शकते. जर तुम्ही जास्त स्वारस्य दाखवले नाही, तर तो जास्त सवलत देईल अशी शक्यता असते.

  1. कार खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी?

शोरूममध्ये तुम्ही कोणते वाहन पाहणार आहात, त्याची संपूर्ण माहिती सेल्समनला द्या, सर्व वैशिष्ट्यो आणि इंजिनबद्दल विचारा. जर तुम्हाला नवीन कार घेण्यासाठी कर्ज हवे असेल तर जाणून घ्या विविध बँकांचे व्याजदर. कारमध्ये काही समस्या आहे का हे पाहण्यासाठी डिलिव्हरीपूर्वी कारची तपासणी करा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article